स्वाध्याय । पाठ १०. शर्थीने खिंड लढविली
१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(अ) सिद्दी जौहरने ....... गडाला चौफर वेढा घातला.
👉 सिद्दी जौहरने पन्हाळ गडाला चौफर वेढा घातला.
(आ) बाजीप्रभूची ...... बघून शिवराय गहिवरले.
👉 बाजीप्रभूची स्वामीभक्ती बघून शिवराय गहिवरले.
(इ) घोडखिंड .......... या नावानेच इतिहासात अमर झाली.
👉 घोडखिंड पावनखिंड या नावानेच इतिहासात अमर झाली.
२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी सिद्धीला कोणता निरोप पाठवला ?
👉 शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून घेण्यासाठी 'लवकरच किल्ला तुमच्या स्वाधीन करतो' असा निरोप पाठवला.
(आ) सिद्धी जौहर का चवताळला ?
👉 शिवराय हातावर तुरी देऊन निसटल्याचे लक्षात येताच, सिद्धी जौहर चवताळला.
(इ) विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूंना काय म्हणाले ?
👉 विशाळगडाकडे जाताना शिवराय बाजीप्रभूंना म्हणाले की, आम्ही गडावर जातो , तेथे पोहोचताच तोफांचे आवाज होतात. मग ताबडतोब खिंड सोडून तुम्ही निघून जा.
३. दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवरायांनी कोणती युक्ती योजली ?
👉 1. शिवरायांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी एक युक्ती योजली. त्यांनी दोन पालख्या सज्ज केल्या.
2. एका पालखीतून शिवरायांचा वेश धारण केलेली व्यक्ती राजदिंडी दरवाजातून बाहेर पडणार. ही पालखी शत्रू सैन्याला सहज दिसणार असल्याने ती पकडली जाणार.
3. त्याच वेळी दुसऱ्या पालखीतून शिवराय अवघड वाटेने निसटून जाणार.
(आ) बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी कोणती योजना आखली ?
👉 1. बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी आपल्या हातात समशेर घेतली आणि ते खिंडीच्या तोंडाशी उभे राहिले.
2. बाजीप्रभूने मावळ्यांच्या तुकड्या पाडल्या व त्यांना जागा नेमून दिल्या. खिंडीच्या तोंडावर मावळ्यांची पोलादी फळी तयार केली.
3. शत्रू खिंडीत आल्यावर दगड गोट्यांचा वर्षाव करायचा, अशा प्रकारे बाजीप्रभूने शत्रूला घोडखिंडीत रोखण्यासाठी योजना आखली.
४. करणे लिहा.
(अ) आदिलशहा भयंकर चिडला.
👉 1. शिवरायांनी विजापूर दरबारातील अफजलखानाचा वध केला होता.
2. त्याच्या मागोमाग शिवरायांनी विजापूरकरांच्या ताब्यातील पन्हाळगड जिंकला. त्यामुळे आदिलशहा भयंकर चिडला.
(आ) शिवरायांच्या सेवमधील शिवाजी अमर झाला.
👉 1. शिवरायांप्रमाणे दिसणाऱ्या शिवा काशिदची पालखी शिवरायांची आहे, असे समजून शत्रूच्या सैनिकांनी ती पकडली व सिद्दी जौहरच्या छावणीत नेली.
2. यादरम्यान शिवराय दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले.
3. इकडे थोड्या वेळाने शिवा काशीदचा डाव उघडकीस आल्यावर सिद्दीने संतापून त्याला ठार केले. अशा प्रकारे शिवरायांसाठी व स्वराज्यासाठी आत्मबलिदान करून शिवरायांच्या सेवेमधील शिवा काशीद अमर झाला.
(इ) पावनखिंड इतिहास अमर झाली.
👉 1.स्वामिनिष्ठ बाजीप्रभूने घोडखिंड शेवटपर्यंत लढवली.
2. महाराज गडावर पोचल्याची खूण म्हणून केलेल्या तोफांचे आवाज कानी पडल्यावरच धारातीर्थी कोसळलेल्या बाजीप्रभूने प्राण सोडला.
3. अशा प्रकारे स्वामिनिष्ठांच्या रक्ताने घोडखिंड पावन झाली; त्यामुळे 'पावनखिंड' या नावाने ती इतिहासात अमर झाली.
५. कोण ते लिहा.
(अ) शुर पण क्रूर होता. 👉 सिद्दी जौहर.
(आ) घोडखिंडीत शर्थीची झुंज देणारे.👉 बाजीप्रभू देशपांडे
(इ) वेढ्यातून निसटून जाणारे. 👉 शिवाजीराजे.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
स्वाध्याय । पाठ ९. प्रतापगडावरील पराक्रम । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग २
स्वाध्याय । पाठ ११. शायिस्ताखानाची फजिती । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग २
0 टिप्पण्या