स्वाध्याय । पाठ १२. पुरंदरचा वेढा व तह
१. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.
(अ) त्यावेळची मुघली मुलखातील मोठी व्यापार पेठ म्हणजे .......... .
(पुणे, सुरत, दिल्ली)
👉 त्यावेळची मुघली मुलखातील मोठी व्यापार पेठ म्हणजे सुरत
(आ) पुरंदरचा किल्लेदार ......... मोठा जिद्दीचा वीर होता.
(बाजीप्रभू, तानाजी, मुरारबाजी)
👉 पुरंदरचा किल्लेदार मुरारबाजी मोठा जिद्दीचा वीर होता.
२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) शिवरायांनी सुरत शहरावर छापा का घातला ?
👉 औरंगजेब बादशहाच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या. म्हणून बादशहावर जबर वचक बसवण्यासाठी शिवरायांनी सुरत शहरावर छापा मारला.
(आ) दिलेरखानाने पुरंदरला वेढा का दिला ?
👉 पुरंदर सारखा बळकट व प्रचंड किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांना बीमोड होऊ शकणार नाही. हे जाणून दिलेरखानाने पुरंदरला वेढा दिला.
(इ) मुघलांशी तह करण्याचे शिवरायांनी का ठरवले ?
👉 मुघलांच्या सामर्थ्यापुढे शक्ति चालेना आणि युक्तीही उपयोगी पडेना; तेव्हा काही काळ माघार घेणे हेच योग्य असा विचार करून मुलांची तह करण्याचे शिवरायांनी ठरवले.
(ई) पुरंदरच्या तहात शिवरायांनी मुघलांना कोणता मुलुख देण्याचे कबूल केले ?
👉 पुरंदरच्या तहात शिवरायांनी 23 किल्ले व त्या खालच्या चार लक्ष होनांचा मुलुख देण्याचे कबूल केले.
३. दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेरखान त्याला काय म्हणाला ?
👉 मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेरखान त्याला म्हणाला की, मुरारबाजी, तुझ्यासारखा समशेरबहाद्दर मी आजवर पाहिला नाही. तू आमच्या बाजूला ये. कौल घे. बादशाहा तुला सरदार करतील. जहागीर देतील. बक्षीस देतील !"
(आ) मुरारबाजीने दिलेरखानास कोणते उत्तर दिले?
👉 'बादशाहाच्या बाजूला ये,' असे दिलेरखानाने सांगताच मुरारबाजीने चवताळून दिलेरखानाला उत्तर दिले, 'अरे, आम्ही शिवाजी महाराजांची माणसे! तुझा कौल 11 घेतो की काय? आम्हांला काय कमी आहे? तुझ्या बादशाहाची जहागीर हवी कोणाला? "
४. पाठात आलेल्या नावांच्या अक्षरांवरून शब्द पूर्ण करा.
(अ) औ............
👉 औरंगजेब.
(आ) पु...........
👉 पुरंदर.
(इ) मु...........
👉 मुरारबाजी.
(ई) ज.........
👉 जयसिंग.
(उ) दि...........
👉 दिलेरखान.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
स्वाध्याय । पाठ १३. बादशहाच्या हातावर तुरी दिल्या । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग २
स्वाध्याय । पाठ ११. शायिस्ताखानाची फजिती । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग २
0 टिप्पण्या