स्वाध्याय । पाठ १६. दक्षिणेतील मोहीम । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग २ | Dakshinetil Mohim Swadhyay 4thi

 स्वाध्याय । पाठ १६. दक्षिणेतील मोहीम 

१. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

(अ) व्यंकोजीराजे हे दक्षिणेतील ............ जहागीर सांभाळून होते.

(वेलूरची, तंजावरची, बंगळूरची) 

👉 व्यंकोजीराजे हे दक्षिणेतील तंजावरची जहागीर सांभाळून होते.

(आ) कुतुबशाहाची .......... ही राजधानी होती. 

(दिल्ली, जिंजी, गोवळकोंडा)

👉 कुतुबशाहाची गोवळकोंडा ही राजधानी होती. 


२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) शिवरायांचा व्यंकोजीराजांची भेट घेण्यामागे कोणता हेतू होता ?

👉 आपल्याशी फटकून वागणाऱ्या व्यंकोजीराजांची भेट घेऊन, स्वराज्याच्या कार्यासाठी त्यांची मदत मिळाली तर पहावी. असा शिवरायांचा या भेटीमागे हेतू होता. 

(आ) शिवरायांनी व्यंकोजीराजांना कोणती गळ घातली ?

👉 स्वराज्याच्या कार्यात सहकार्य करावे अशी गळ शिवरायांनी व्यंकोजीराजांना घातली.

(इ) शिवरायांनी व्यंकोजीराजांना पत्रात काय लिहिले ?

👉 शिवरायांनी व्यंकोजीराजांना पत्रात लिहिले की, "परक्या शत्रूचा भरवसा धरू नये पुरुषार्थ गजवावा."


३. कारणे लिहा.

(अ) शिवरायांनी दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले.

👉 1. उत्तरेचा मुघल बादशहा औरंगजेब हा मराठ्यांचे राज्य नष्ट करण्यासाठी टपून बसला होता. 

2. स्वराज्यावर मुघलांचे संकट आले तर , दक्षिणेतील एखादे मजबूत ठाणे आपल्याकडे असावे, या हेतूने शिवरायांनी  दक्षिण आपल्या ताब्यात घेण्याचे ठरवले

(आ) शिवरायांनी व्यंकोजीराजांना समजुतीची पत्रे पाठवली.

👉 1. कर्नाटक मोहिमेच्या काळात भेटीस बोलावलेले व्यंकोजीराजे काही काळ महाराजांबरोबर राहून, एके रात्री महाराजांना न कळवताच, तंजावरला निघून गेले. 

2. त्यांनी शिवरायांच्या फौजेवरच हल्ला केला. 

3. आपल्या भावाच्या अशा वागणुकीमुळे शिवरायांना फार वाईट वाटले, म्हणून त्यांनी व्यंकोजीराजांना समजुतीची पत्रे पाठवली.


हे पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय । पाठ १५. एक अपूर्व सोहळा । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग २

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या