स्वाध्याय । पाठ १३. अन्न टिकवण्याच्या पद्धती । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Swadhyay Ann Tikavanyachya Paddhati 5vi

 स्वाध्याय । पाठ १३. अन्न टिकवण्याच्या पद्धती




१. काय करावे बरे ? 

(अ) पापड सादळले आहेत.

👉 दमट झालेला पापडांना वाळवण्यासाठी ठेवावे. तीन चार दिवस कडक उन्हात वाळवल्यावर हवाबंद डब्यात घट्ट बंद करून ठेवावेत.

(आ) आंबा, कैरी, आवळा, पेरू अशी फळे, तर मटार, मेथी, कांदा, टोमॅटो अशा भाज्या ., , ठरावीक काळात भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. ते वर्षभर वापरायचे आहेत.

👉 आंब्यांचा रस काढून तो वाळवून ठेवता येतो, आंबापोळी ही बनवता येते. कैरी, आंबा यांची लोणची, मुरंबा असे प्रकार बनवून ठेवता येतात. कैरी, आंबा, पेरू यांची सरबते व जॅम देखील बनवता येते. मटार सोलुन त्याचे दाणे फ्रिज करता येतात. मेथीपासून ठेपले, मुठीया असे पदार्थ करून ती टिकवता येते. टोमॅटो सॉस, टोमॅटो प्युरी-दाट रस अशी उत्पादने बनवता येतात. कांदा वाळवून तो कोरड्या जागी योग्य प्रकारे साठून ठेवता येतो. बारीक कापलेला कांदा तळुन ठेवल्यास पुष्कळ दिवस टिकतो. आशा पद्धतीने आपण वर्षभर वापरू शकतो.


२. जरा डोके चालवा.

शेवया अनेक दिवस चांगल्या राहतात; परंतु शेवयांची खीर लवकरच खराब होते, असे का ?

👉  शेवया उन्हात वाळवून तयार केलेल्या असतात. त्यात पाण्याचा अंश नसल्याने त्या अनेक दिवस चांगल्या राहतात. परंतु शेवयांची खीर दुधात बनवलेली असते. दूध टिकाऊ नसल्यामुळे खीर लवकर खराब होते. 


३. चूक की बरोबर ते सांगा.  चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा.

(अ) पदार्थ उकळतो तेव्हा त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश होतो.

👉 बरोबर.

(आ) सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले, की आपले अन्न खराब होत नाही.

👉 चूक 

दुरुस्त विधान - सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले, की आपले अन्न खराब होते.

(इ) उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले पदार्थ वर्षभर वापरता येत नाहीत.

👉 चूक.

दुरुस्त विधान - उन्हाळ्यात वाळवून ठेवलेले धाण्यासारखे पदार्थ वर्षभर वापरता येतात.

(ई) फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला ऊब मिळते.

👉 चूक.

दुरुस्त विधान - फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे अन्नाला थंडावा मिळतो.


४. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) अन्न कोणकोणत्या पद्धतीने टिकवले जाते ?

👉 वळवणे, हवाबंद डब्यात ठेवणे, थंड जागी ठेवणे, उकळणे, आणि अन्न परीक्षक वापरणे अशा पद्धतीने अन्न टिकवले जाते.

(आ) खराब झालेले अन्न आपण खाण्याचे का टाळतो ?

👉  1. सूक्ष्मजीवांमुळे अन्न खराब होते.  हे सूक्ष्मजीव शरीराला अपाय करतात.

2. खराब अन्नाचा वास आणि स्वरूप दोन्ही बिघडलेले असते .

3. अशा अन्नाच्या सेवनाने पोटदुखी, जुलाब, उलट्या होऊ शकतात. 

4. कधी कधी खराब अन्नाला बुरशी लागते. 

या सर्व कारणांमुळे आपण खराब झालेले अन्न खाण्याचे टाळतो .

(इ) फळांचे मुरांबे का केले जातात ?

👉 फळे जास्त काळ टिकत नाहीत त्यावर सूक्ष्मजीव किंवा बुरशी वाढू शकते फळे टिकवायची असल्यास त्यात साखरेसारखे परिरक्षक घालून ती टिकवता येतात. म्हणून हंगामानंतर तशाच चांगल्या स्वादातली फळे खाण्यासाठी फळांचे मुरांबे केले जातात

(ई) परिरक्षकांचा वापर कशासाठी करतात ?

👉 जे अन्नपदार्थ टिकवता येत नाहीत ते पदार्थ परिरक्षकांमुळे जास्त काळपर्यंत टिकवता येतात. खराब होणारे अन्नपदार्थ हंगामानंतरही टिकवलेल्या स्वरूपात राहावेत यासाठी परिरक्षकांचा वापर करतात

(ए) मसाल्याचे विविध पदार्थ कोणते ? ते वनस्पतींचा कोणता भाग आहेत ?

👉  धणे, दालचिनी, लवंगा, वेलची, जायफळ, जिरे, काळी मिरी, तमालपत्र असे मसाल्याचे विविध पदार्थ आहेत. 

धणे, जिरे, काळी मिरी या वनस्पतीच्या बिया आहेत. दालचिनी ही झाडाच्या खोडापासून बनवतात. खोडाची जाड साल आपण दालचिनी म्हणून वापरतो. तमालपत्र हे आहे, तर लवंगा या फुलाच्या सुकलेल्या देठापासून तयार होतात. वेलची, जायफळ ही त्या त्या झाडांची फळे आहेत...


हे पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय । पाठ १२. सर्वांसाठी अन्न । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Swadhyay sarvansathi ann 5vi 

स्वाध्याय । पाठ १४. वाहतूक । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Swadhyay Vahatuk 5vi 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या