स्वाध्याय । पाठ २५. अवती भवती होणारे बदल । इयत्ता :- ३ री । विषय :- परिसर अभ्यास | Aplya Avati Bhavati Honare Badal Swadhyay 3 ri

 स्वाध्याय । पाठ २५. अवती भवती होणारे बदल 




(अ) काय करावे बरे ?

आवळ्याच्या फोडी बनवण्यासाठी दिवसभर उन मिळेल अशा ठिकाणी ठेवायचे आहे. 

👉 आवळ्याच्या फोडी वाळवण्यासाठी घराच्या छतावर किंवा अंगणात ठेवाव्यात.


(आ) जरा डोके चालवा. 

🔵 तुमची सावली अगदी लहान असते, त्यावेळी सुर्य कुठे असतो? 

👉 आमची सावली अगदी लहान असते, म्हणजे सूर्य डोक्यावर असतो.

🔵 चंद्राची कोर म्हणजे काय ?

👉 चंद्राची कोर म्हणजे चंद्राचा अत्यंत कमी दिसणारा प्रकाशित भाग.

🔵 एका अमवास्येपासून दुसरी अमवस्या किती दिवसांनी येते ?

👉 एक अमवास्येपासून दुसरी अमवस्या तीस दिवसांनी येते.

🔵  सकाळच्या वेळेस उमलणाऱ्या फुलांची यादी करा.  

👉 मोगरा, गुलाब, जाई इत्यादी.


(इ) निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा. 

ज्या दिवशी आभाळात ढग नसतील अश्या एखाद्या दिवशी शाळेजवळ  मोकळ्या मैदानात जा. एखादा खांब, झाड, ध्वज स्तंभ अशी उंच वस्तू शोधा किंवा शाळेच्या पटांगणात एक खांब उभा करा. निरीक्षण करून पुढील तक्ता पूर्ण करा. 


या निरिक्षणातून काय उलगडले ते तक्त्याखली लिहून ठेवा. 

👉 


(ई) गाळलेले शब्द भरा. 

(१) वटवाघूळ ........ प्राणी आहे.

👉 वटवाघूळ  निशाचर प्राणी आहे.

(२) पोट भरले की गाई, म्हशी निवांत ठिकाणी बसून ..... करू लागतात.

👉 पोट भरले की गाई, म्हशी निवांत ठिकाणी बसून रवंथ करू लागतात.

(३) रात्र संपत आल्याची चाहूल ..... लागते. 

👉 रात्र संपत आल्याची चाहूल पक्ष्यांना लागते. 


(उ) खालील प्रश्नांची उत्तरे द्या.

(१) सावल्या लांब किंवा पडतात ?

👉 सूर्य उगवताना व मावळताना सावल्या लांब पडतात.

(२) आकाशात सूर्य डोक्यावर आला की सावल्या कशा होतात?

👉 आकाशात सूर्य डोक्यावर आला की सावल्या खूपच लहान होतात.

(३) अमावस्येच्या नंतर किती दिवस चंद्राचा आकार मोठा होत जातो ?

👉 अमावस्येच्या नंतर पंधरा दिवस चंद्राचा आकार मोठा होत जातो.

(४) मधमाश्या फुलांपाशी कशासाठी येतात?

👉 मधमाश्या फुलांपाशी मकरंद गोळा करण्यासाठी येतात.


(ऊ) चूक की बरोबर ते सांगा.

(१) अमावस्येच्या दिवशी चंद्र डोळ्यांना दिसत नाही. 

👉 बरोबर. 

(२) काही सजीव सुर्य मावल्यानंतर अन्न शोधायला बाहेर पडतात. 

👉 बरोबर.

(३) चंद्र त्रिकोणी दिसतो, त्या दिवसाला पौर्णिमा म्हणतात. 

👉 चूक.

(४) भल्या पहाटेपासून पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो 

👉 बरोबर.

(५) सुरू हळूहळू पूर्वेकडे सरकू लागतो.

👉 चूक.


(ए) एका शब्दात सांगा.

(१) दरोरोज चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात ते 

👉  चंद्रकला.

(२) जे प्राणी दिवस विश्रांती घेतात आणि अन्न शोधण्यासाठी रात्री बाहेर पडतात ते प्राणी 

👉 निशाचर.

(३) ज्या दिवशी चंद्र गोल गरगरीत दिसतो 

👉 पौर्णिमा 

(४) ज्या दिवशी चंद्र डोळ्यांना दिसत नाही 

👉 अमावस्या 



हे पण वाचा 👇👇👇👇👇 

स्वाध्याय ।  पाठ २४. आपले कपडे।  इयत्ता :- ३ री ।  विषय :- परिसर अभ्यास 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या