15 माझा जिल्हा माझे राज्य स्वाध्याय
(अ) खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(१) संत्र्याचे पीक महाराष्ट्रात कोणत्या भागात घेतले जाते ?
👉 संत्र्याचे पीक महाराष्ट्रात नागपूर, वर्धा आणि अमरावती या भागात घेतली जाते.
(२) नारळ, सुपारी व आंबा ही पिके राज्याच्या कोणत्या भागात घेतली जातात ?
👉 नारळ, सुपारी व आंबा ही पिके कोकण भागातील रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात घेतली जाते
(३) तुमच्या परिसरातील मराठी भाषेच्या बोली लिहा.
👉 माझ्या परिसरातील मराठी भाषेची बोली अहिराणी आहे.
(४) महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी कोणती ?
👉 वैनगंगा ही महाराष्ट्र राज्याच्या पूर्व भागात उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी आहे.
(५) राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ज्वारीचे पीक घेतले जाते ?
👉 राज्यात नाशिक, धुळे, औरंगाबाद ( छत्रपती संभाजी नगर ), अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा व सांगली या जिल्ह्यांमध्ये ज्वारीचे पीक घेतले जाते.
(६) ' १ मे ' आपल्या राज्यात कशासाठी साजरा करतात ?
👉 ' १ मे ' हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात तसेच कामगार दिन म्हणूनही साजरा करतात.
(आ) कृती करा : तुमच्या आवडत्या सणाचे चित्र काढा.
👉 तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका सणाचे चित्र काढायचे आहे.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
१४ नकाशा आणि खुणा स्वाध्याय ४ थी परिसर अभ्यास भाग १
१६ दिवस आणि रात्र स्वाध्याय ४ थी परिसर अभ्यास भाग १
0 टिप्पण्या