स्वाध्याय । पाठ ७. निवारा ते गाव वसाहती । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग २ | Nivara Te Gav Vasahati Swadhyay 5vi

 स्वाध्याय । पाठ ७. निवारा ते गाव - वसाहती


१. प्रत्येकी एका वाक्यात उत्तर लिहा. 

(अ) बुद्धिमान मानवाचा कोणत्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता ? 

👉 बुद्धिमान मानवाचा रानडुक्कर, हरीण, डोंगरी शेळी यांसारख्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर अधिक भर होता.

(आ) नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते?

👉 शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे.


 २. पुढील विधानांची कारणे लिहा.

(अ) मध्याश्मयुगात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता.

👉 मध्याश्मयुगात हवामान उबदार होऊ लागले होते. फार मोठ्या प्रमाणावर झालेली शिकार आणि पर्यावरणातील बदल यांमुळे मध्याश्मयुगापर्यंत मोठे प्राणी नष्ट होऊ लागले. त्यामुळे शिकारीच्या बरोबरीने बुद्धिमान मानव मोठ्या प्रमाणावर मासेमारी करू लागला. या कारणांमुळे  मध्याश्मयुगात बुद्धिमान मानवाच्या आहार पद्धतीत बदल होत होता.

(आ) मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला.

 👉 1. भटकंती करणाऱ्या बुद्धिमान मानवाचे समूह बदलत्या हवामानानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वस्ती करून राहत असत.

2. हवामान बदलानुसार धान्याची कापणी करणे, फळे-कंदमुळे गोळा करणे ही कामे ते करीत असत. 

3.मासे कोणत्या हंगामात मोठ्या प्रमाणात मिळतात, अधिक शिकार कोणत्या ठिकाणी मिळेल यांचे ते निरीक्षण करीत असत.

यामुळे मानव एके ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम करू लागला.


३. मध्याश्मयुगीन हंगामी तळाच्या कल्पना चित्राचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या चित्रातील घरांची रचना कशी आहे चित्रातील घरांच्या बांधणी साठी कोणते साहित्य वापरले आहे वापरलेले आढळते.

(अ) चित्रातील घरांची रचना कशी आहे.

👉 चित्रातील घरे गवताने साकारलेली आहे व ते उतरत्या छपराची आहे.

(आ) चित्रातील घरांच्या बांधणीसाठी कोणते साहित्य वापरलेले आढळते ?

👉 चित्रातील घरांच्या बांधणीसाठी लाकूड व गवत वापरलेले आढळते.

(इ) हंगामी तळातील व्यक्ती कोणते व्यवसाय करत असाव्यात ?

👉 हंगामी तळातील व्यक्ती मासेमारी, शेती, छोट्या होड्या तयार करणे, घरबांधणी इत्यादी व्यवसाय करत असावेत.


४. विविध ऋतूंमध्ये होणाऱ्या हवामान बदलाचा तुमच्या जगण्यावर कसा परिणाम होतो, ते लिहा.

👉 

1. उन्हाळा :-  या ऋतुमध्ये आपण सुती कपडे वापरतो, थंड पदार्थ खातो. उन्हापासून आपले संरक्षण व्हावे यासाठी आपण थंड जागी राहतो. 

2. पावसाळा :- या ऋतूमध्ये लवकरात लवकर वाळतील असे कपडे घालतो. जड आहार न घेता हलका आहार घेतो. पाणी उकळून थंड करून पितो. 

3. हिवाळा :- या दिवसांमध्ये लोकरीची उबदार वस्त्रे वापरतो. उन अंगावर घेतो. अंगात उष्णता निर्माण करतील असे पदार्थ खातो. उबदार जागेत राहतो. अशा रीतीने विविध ऋतुंमध्ये हवामान बदलाचा परिमाण आपल्या जगण्यावर होतो.


५. नवाश्मयुगीन खेडे आणि आधुनिक खेडे यांची तुलना करा.

👉

नवाश्मयुगीन खेडे (गाव) :- 

1. नवाश्मयुगात गाव वसाहती स्थापन करण्यास सुरुवात झाली होती.

2. या काळामध्ये खेड्यातील मानवसमूह प्रामुख्याने पशुपालन व शेती करू लागला होता.

3. या काळात शेतीचे अवजारे प्राथमिक स्वरुपाची होती.

4. शेतीची प्रारंभिक अवस्था असल्यामुळे पाणी सिंचनाची व्यवस्था, धान्याचे प्रकार मर्यादित होते.

आधुनिक खेडे (गाव) :-

1. आधुनिक काळात गाव- वसाहती स्थापन होऊन तेथे अनेक पिढ्या स्थिरावल्या आहेत.

2. आधुनिक काळातील खेड्यांत शेतीखेरीज अनेक पूरक उद्योगधंदे सुरु झाले आहेत.

3. आधुनिक खेड्यांत प्रगत अवजारे वापरून शेती केली जाते.

4. आधुनिक काळात खेड्यांमध्ये पाणी सिंचनाचे व अन्नधान्याचे विविध प्रकार उपलब्ध आहेत.


हे पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय । पाठ ६. अश्मयुग दगडाची हत्यारे ।  इयत्ता :- ५ वी ।  विषय :- परिसर अभ्यास भाग २ | Swadhyay Ashmayug Dagadachi Hatyare 5vi

स्वाध्याय । पाठ ८. स्थिर जीवनाची सुरुवात ।  इयत्ता :- ५ वी ।  विषय :- परिसर अभ्यास भाग २ | Swadhyay Sthir Jivanachi Suruvat  5vi

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या