स्वाध्याय । पाठ १८. पर्यावरण आणि आपण
१. काय करावे बरे ?
नदी, तलाव यांमध्ये जलपर्णीची चादर पसरली आहे.
👉 नदी, तलाव यांमध्ये जलपर्णीची चादर पसरली असेल तर ती वेळोवेळी काढून टाकावी. जलपर्णी मुळे पाण्यातील ऑक्सिजन चे प्रमाण कमी होते त्यामुळे त्या जलाशयात असणाऱ्या जलचर प्राण्यांना ऑक्सिजन ची कमतरता भासते. तसेच जलपर्णी मुळे सूर्यप्रकाश जलचर प्राण्यांपर्यंत पोहचत नाही. म्हणून ही जलपर्णी ची चादर वेळोवेळी काढून टाकवी.
२. जरा डोके चालवा.
एखादया ठिकाणी घारी राहिल्या नाहीत तर काय होईल? कोणत्या सजीवांची संख्या वाढेल? कोणत्या सजीवांची संख्या कमी होईल ?
👉 घार हा पक्षी छोट्या प्राण्यांची शिकार करून खातो. जर एखाद्या ठिकाणातील घारी राहिल्या नाही तर त्या ठिकाणी छोटे पक्षी, उंदीर, यांसारख्या प्राण्यांची संख्या बेसुमार वाढेल. आणि घारीवर अन्नासाठी अवलंबून राहणाऱ्या प्राण्यांच्या संख्येत घट होईल.
३. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) स्थलांतर म्हणजे काय ?
👉 प्राणी, पक्षी हवामान बदलानुसार वास्तव्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तात्पुरते किंवा कायमस्वरूपी जातात यालाच स्थलांतर असे म्हणतात.
(आ) पक्ष्यांचा जीवनक्रम लिहा.
👉 पक्षी घरट्यात अंडी घालतात. काही काळासाठी ही अंडी घरट्यात उबावली जातात. अंड्यातून पिल्ले बाहेर आले की त्यांची काळजी घेतली जाते. पिल्लू मोठे होऊन ते उडू लागले की ते घरट्यातून उडून जाते.
(इ) हवा प्रदूषणाची दोन कारणे लहा.
👉 1. कारखान्यांच्या धुरातून बाहेर पडणारे विषारी वायू.
2. इंधनाच्या ज्वलनातून निघणारा धूर व विषारी वायू.
(ई) जमिनीवरच्या उपलब्ध वनक्षेत्राचा वापर आपण कशासाठी करतो ?
👉 जमिनीवरील उपलब्ध वनक्षेत्राचा वापर आपण शेती, उद्योगधंदे, जळाऊ लाकूड, आयुर्वेदिक औषधे, उद्योगधंद्यांसाठी लागणारा कच्चा माल यासाठी उपलब्ध वनक्षेत्राचा आपण वापर करतो.
४. कारणे लिहा.
(अ) जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे.
👉 जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्वाचे आहे, कारण जर घटकांशी संबंधांवर परिणाम होऊन जैविकघटकांपैकी एक जरी घटक कमी झाला तर त्याचा परिणाम त्याच्या इतर निसर्गाचा समतोल बिघडेल याचा परिणाम मानवावरही होईल. म्हणून जैविक घटकांचे संवर्धन करणे महत्वाचे आहे.
(आ) वन्यप्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे.
👉 वन्यप्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. कारण,
1. मानवाने बेसुमार जंगलतोडीमुळे पर्यावरणातील विविध सजीवांचे निवारे नष्ट झाले.
2. जंगलात राहणाऱ्या प्राण्यांच्या सर्व गरजा या जंगलातच पूर्ण होतात परंतु मानवच्या हस्तक्षेपामुळे ही जंगलेच नष्ट झाल्याने त्यांचे अस्तित्व धोक्यात आले.
3. वाढत्या प्रदूषणामुळे प्राण्यांच्या प्रजातींवर गंभीर परिणाम दिसून आला.
५. चूक की बरोबर ते लिहा.
(अ) अजैविक घटकांमध्ये मृत वनस्पती व प्राण्यांचा समावेश होतो.
👉 बरोबर.
(आ) जैवविविधता जपणे आवश्यक आहे.
👉 बरोबर.
६. खाली दिलेल्या वस्तू / पदार्थ / घटक यांची मानवनिर्मित व निसर्गनिर्मित अशा गटांमध्ये विभागणी करा.
माती, घोडा, दगड, जलपर्णी, पुस्तक, सूर्यप्रकाश, डॉल्फीन, पेन, खुर्ची, पाणी, कापूस, टेबल, झाडे, वीट.
👉 मानवनिर्मित :- पुस्तक, पेन, खुर्ची, टेबल, वीट.
निसर्गनिर्मित :- मती, घोडा, दगड, जलपर्णी, सूर्यप्रकाश, डॉल्फिन, पाणी, कापूस, झाडे.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
स्वाध्याय । पाठ १९. अन्नघटक । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Swadhyay Annaghatak 5vi
0 टिप्पण्या