12 छोटे आजार घरगुरती उपचार स्वाध्याय
(अ) काय करावे बरे ?
मुंबईच्या एका शाळेत हेलन चौथीत शिकते. एके दिवशी संध्याकाळी शाळेतून घरी जाताना एका वाहनाचा धक्का लागून ती पडली. तिची शुद्ध हरपली. पायाला जबरदस्त दुखापत झाली.
👉 हेलन ला लगेच वैद्यकीय मदत मिळवून द्यावी. तिला त्वरित दवखान्यात घेऊन जावे. दवखान्यात नेत असताना तिच्या ज्या पायाला जबरदस्त दुखापत झाली आहे त्या पायाची काळजी घ्यावी. तिच्या पालकांना फोन करून कळवावे व दवखान्यात बोलवून घ्यावे. डॉक्टरांनी सांगितलेली सर्व औषधे वेळेवर घेण्यास सांगणे.
(आ) जरा डोके चालवा.
१. अडुळशाच्या पानांचा अर्क कशासाठी उपयोगी पडतो ?
👉 सर्दी खोकला बरा करण्यासाठी अडुळशाच्या पानांचा अर्क उपयोगी पडतो.
२. सर्दीची लक्षणे कोणती ?
👉 1. नाकातून पाणी येणे.
2. नाक व डोळे लाल होणे.
3. डोके दुखणे.
4. अंग मोडून पडणे.
5. श्वास घ्यायला त्रास होणे.
३. बाम कशासाठी वापरला जातो?
👉 डोकेदुखी, अंगदुखी असा त्रास जाणवत असल्यास त्यातून थोडा आराम मिळावा म्हणून दुखणाऱ्या भागावर बाम लावला जातो. त्यामुळे त्या भागात थोडी उष्णता निर्माण होऊन दुखत असणाऱ्या भागाला थोडा आराम मिळतो.
४. ताप उतरल्याची खूण कोणती ?
👉 घाम येणे ही ताप उतरल्याची खूण आहे.
(इ) कोष्टक पूर्ण करा.
पुढे काही आजारांची नावे दिली आहेत.
(१) सर्दी (२) चिकुनगुनिया (३) हिवताप (४) खेळताना पडून खरचटणे (५) पोटाला तड लागणे (६) विषमज्वर (७) गरम तव्याचा बोटांना चटका बसणे (८) पाय मुरगळणे.
यांपैकी कोणते आजार लवकर बरे होणार आहेत, कोणते लवकर बरे न होणारे आहेत, ठरवा आणि खालील कोष्टक पूर्ण करा.
👉
(ई) थोडक्यात उत्तरे लिहा.
(१) सखूचा घसा का दुखू लागला ?
👉 सखूने थंडगार आइस्क्रीम खाल्याने सखुचा घसा दुखू लागला.
(२) कावीळ झाल्यामुळे ताईला किती काळ पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली ?
👉 कावीळ झाल्यामुळे ताईला तीन आठवडे पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली.
(३) सर्दीवर घरगुती उपचार कोणता ?
👉 सर्दी झाल्यास गरम पाण्याचा वाफारा घेतात. छाती शेकतात. ओवा तव्यावर गरम करून त्याची वाफ घेणे.
(४) डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय पोटात घ्यायची औषधे घ्यावीत का ?
👉 डॉक्टरांच्या सल्ल्या शिवाय पोटात घ्यायची औषधे घेऊ नयेत. औषधे हे नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.
(उ) गाळलेले शब्द भरा.
(१) सखूच्या ताईचे डोळे ...... दिसत होते.
👉 सखूच्या ताईचे डोळे पिवळसर दिसत होते.
(२) ...... चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला.
👉 साप चावल्यामुळे श्रीपती चांगलाच घाबरला.
(३) धुतलेली जखम ...... करून त्यावर टिंक्चर आयोडीन लावावे.
👉 धुतलेली जखम कोरडी करून त्यावर टिंक्चर आयोडीन लावावे.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
११. पाहू तरी शरीराच्या आत स्वाध्याय ४ थी परिसर अभ्यास भाग १
१३. दिशा व नकाशा स्वाध्याय ४ थी परिसर अभ्यास भाग १
0 टिप्पण्या