16 दिवस आणि रात्र स्वाध्याय 4 थी परिसर अभ्यास भाग 1 | Divas Aani Ratra Swadhyay 4 thi

 16. दिवस आणि रात्र स्वाध्याय 

दिवस आणि रात्र स्वाध्याय divas ani ratra swadhyay

(अ) जरा डोके चालवा. 

(१) अमावस्येला चंद्र आकाशात असतो पण दिसत नाही त्याचे कारण काय असेल ?

👉 चंद्राला सूर्यापासून प्रकाश मिळतो. सूर्य प्रकाश पृथ्वीवर पडतो आणि तेथून परावर्तित होऊन चंद्राला मिळतो. अमावस्येला पृथ्वीवरील परावर्तित प्रकाश चंद्रावर पडत नाही म्हणून अमावस्येला चंद्र दिसत नाही. 

(२)  उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरट्यात लवकर का परततात ?

👉 हिवाळ्यात दिवस लहान असतो त्यामुळे अंधार लवकर पडतो. म्हणून उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात पक्षी घरट्यात लवकर परततात.


(आ) थोडक्यात उत्तरे लिहा.

(१)  पृथ्वीवर प्रकाश कोठून येतो ?

👉 पृथ्वीवर प्रकाश सूर्यापासून येतो.

(२) पृथ्वीचा आकार कसा आहे ?

👉 पृथ्वीचा आकार चेंडू प्रमाणे गोल आहे.

(३) दिवस आहे, असे केंव्हा म्हणतात ?

👉 ज्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश पडतो त्या ठिकाणी दिवस आहे  असे म्हणतात

(४) रात्र आहे, असे केंव्हा म्हणतात ?

👉 ज्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश पोहोचत नाही त्या ठिकाणी अंधार असतो. तिथे रात्र आहे असे म्हणतात. 


(इ) वर्णन करा. 

(१) पृथ्वीचे फिरणे.

👉 पृथ्वी स्वतःभोवती फिरत - फिरत सूर्याभोवती फिरते. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे दिवस व रात्र होतात. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याचा परिवलन असे म्हणतात. पृथ्वीच्या या फिरण्यामुळेच वातावरणात ऋतू परिवर्तन होत असते. 

(२) दिवस आणि रात्र यांचे पाठशिवणीचे चक्र. 

👉 पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. त्यामुळे सूर्याच्या प्रकाश येणारा काही भाग काही  वेळेने अंधारात जातो आणि अंधारात असणारा भाग प्रकाशात येतो. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यामुळे जिथे दिवस आहे तिथे काही वेळाने रात्र होते. अशा पद्धतीने दिवस आणि रात्र यांचे पाठशिवणीचे चक्र सतत सुरू असते.

(ई) रिकाम्या जागा भरा.

(१) दिवसाचे ....... तास असतात.

👉  दिवसाचे चोवीस तास असतात. 

(२) सूर्याच्या उगवण्याला ...... म्हणतात.

👉 सूर्याच्या उगवण्याला सूर्योदय म्हणतात.

(३) सूर्याच्या मावळण्याला ..... म्हणतात.

👉 सूर्याच्या मावळण्याला सूर्यास्त म्हणतात.

(४) २२ मार्चपासून ....... पर्यंत आपल्याकडे दिवस मोठा होत जातो.

👉 २२ मार्चपासून २१ जून पर्यंत आपल्याकडे दिवस मोठा होत जातो


(उ) चूक की बरोबर ते सांगा.

(१) २२ मार्च रोजी दिवस आणि रात्रीचे तास समसमान असतात. 

👉 बरोबर.

(२) २१ जून रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते.  

👉 बरोबर. 

(३) २२ सप्टेंबर रोजी दिवस आणि रात्रीचे तास असमान असतात.

👉 चूक.

(४) २२ डिसेंबर रोजी सर्वात मोठा दिवस व सर्वात लहान रात्र असते.

👉 चूक. 

हे पण वाचा 👇👇👇👇👇

१५ माझा जिल्हा माझे राज्य स्वाध्याय ४ थी  परिसर अभ्यास भाग १ 

१७ माझी जडणघडण स्वाध्याय ४ थी परिसर अभ्यास भाग १ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या