11 पाहू तरी शरीराच्या आत स्वाध्याय 4 थी परिसर अभ्यास भाग 1 | pahu tari sharirachya aat swadhyay 4 thi

 11 पाहू तरी शरीराच्या आत स्वाध्याय

पाहू तरी शरीराच्या आत| pahu tari sharirachya aat swadhyay 



(अ) जरा डोके चालवा.

(१) जोराने पळत गेल्यानंतर आपल्याला धाप का लागते ?

👉 जोराने पळत गेल्यानंतर आपल्या शरीराची हालचाल झाल्याने शरीराला आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन ची गरज वाढते. ऑक्सिजन हे रक्ताच्या माध्यमातून साऱ्या शरीरापर्यंत पोहचवले जाते. या वेळी हृदयाचे आकुंचन व प्रसरण जोराने होते. त्यामुळे हृदयाला ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी फुफ्फुसे देखील ऑक्सिजन मिळवण्यासाठी जोराने कार्य करू लागतात. त्यामुळे जोराने पळत गेल्यानंतर आपल्याला धाप लागते.


(आ) खालील प्रश्नांची उत्तरे दया.

(१) आंतरेंद्रिय म्हणजे काय ?

👉  जे इंद्रिये शरीराच्या आत असतात त्यांना अंतरेंद्रिये म्हणतात. 

 (२) पोटाच्या भागातील पोकळीच्या दोन भागांची नावे सांगा.

👉उदरपोकळी आणि कातीपोकळी ही पोटाच्या भागातील पोकळीच्या दोन भागांची नावे आहेत.

(३) वक्षपोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात कोणती महत्त्वाची इंद्रिये असतात ?

👉 हृदय आणि फुफ्फुसे ही महत्वाची इंद्रिये वक्षपोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात असतात.

(४) श्वास घेतल्याने छाती का फुगते ?

👉 आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपली फुफ्फुसे थोडीशी प्रसरण पावतात त्यामुळे श्वास घेतल्यावर आपली छाती फुगते.

(५) निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच का घातले आहे ?

👉 मेंदू हे शिरोपोकळीतील असणारे अत्यंत महत्वाचे आंतरेन्द्रीय आहे. मेंदूला इजा झाली, तर माणूस कायमचा अपंग होऊ शकतो किंवा तो दगावण्याचा संभव असतो. म्हणून मेंदूला परिपूर्ण संरक्षण मिळावे यासाठी निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच घातले आहे.


(इ) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

१. अन्नाच्या पचनाचे काम करणारी आंतरेंद्रिये .......... असतात .

👉 अन्नाच्या पचनाचे काम करणारी आंतरेंद्रिये उदरपोकळीत असतात.

२. आपल्याला ..... फुफ्फुसे असतात.

👉 आपल्याला दोन फुफ्फुसे असतात. 

३. हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला  ....... ठोका म्हणतात. 

👉 हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला  हृदयाचा ठोका म्हणतात 

४. सर्व भावनांची ....... आपल्याला मेंदूमध्ये होते.

👉 सर्व भावनांची जाणिव आपल्याला मेंदूमध्ये होते.

५. मानवी शरीराची रचना खूप ...... आहे.

👉 मानवी शरीराची रचना खूप गुंतागुंतीची आहे.


(ई) चूक की बरोबर ते लिहा.

१. ग्रासनलिका वक्षपोकळीत असते.

👉 बरोबर.

२. हृदय आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते. 

👉 बरोबर.

३. तोंडातल्या घासाचा ओलसर गोळा होतो.

👉  बरोबर.

४. ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थही मेंदूमध्येच समजतो.

👉 बरोबर. 


(3) कारणे लिहा. 

१. आंतरेंद्रिये जागच्या जागीच रहावी, अशीच शरीराची रचना असते. 

👉 शरीराच्या आत असणारी इंद्रिये ही महत्वाची कामे करत असतात त्यामुळे ती सुरक्षित राहणे गरजेचे असते. आपण कितीही हालचाल केली तरीही आंतरेन्द्रीय जागच्या जागी राहणे गरजेचे असतात. त्यांचे कोणतीही इजा होण्यापासून रक्षण करणे गरजेचे असते. यामुळेच आंतरेन्द्रीय जगाच्या जागी रहावीत अशीच शरीराची रचना असते.

२. शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांतून रक्त खेळते ठेवावे लागते.

👉 आपल्या शरीरात रक्त असते, आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा हवेतील ऑक्सिजन रक्तात मिसळला जातो आणि तो सर्व शरीराला रक्ताच्या मार्फत पोहोचवला जातो. आपल्या अन्नाचे पचन झाल्यानंतर ते अन्न शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत पोहचवण्याचे काम देखील रक्त करते. म्हणूनच शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांतून रक्त खेळते ठेवावे लागते.

३. मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते. 

👉 मेंदू हे शिरोपोकळीत असणारे अत्यंत महत्वाचे आंतरेन्द्रीय आहे. आपल्या शरीराच्या सर्व हालचालींवर मेंदूचे नियंत्रण असते. तसेच आपल्या ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थही मेंदूमध्येच समजतो. जर मेंदूला इजा झाली, तर माणूस कायमचा अपंग होऊ शकतो किंवा तो दगावण्याचा संभव असतो. म्हणून मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते. 


(उ) जोड्या लावा. 


👉 



हे पण वाचा👇👇👇👇👇

 १० वस्त्र स्वाध्याय ४ थी परिसर अभ्यास भाग १ 

 १२ छोटे आजार घरगुरती उपचार स्वाध्याय ४ थी परिसर अभ्यास भाग १ 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या