प्रामाणिक लाकूडतोड्या
एक लाकूडतोड्या आपला उदरनिर्वाह करण्यासाठी जंगलात जाऊन लाकडे तोडत असे आणि ती लाकडे विकून तो पैसे मिळवत असे. जंगलात जाऊन लाकडे तोडणे ही त्याची रोजची दिनचर्या होती.
एके दिवशी नेहमीप्रमाणेच तो लाकडे तोडण्यासाठी जंगलात गेला v नदीकाठी असलेल्या एका झाडावर चढून तो लाकडे तोडू लागला. लाकडे तोडत असताना अचानक त्याची कुऱ्हाड नदीत पडते. नदी खूप खोल असल्यामुळे नदीत जाऊन ती कुऱ्हाड काढणे शक्य नव्हते. त्यामुळे तो दुःखी झाला व रडू लागला.
त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून नदीतून एक देवी बाहेर येते व ती त्याला विचारते ' तू का रडत आहेस ?' त्यावर उत्तर देत तो लाकूडतोड्या म्हणाला ' माझी कुऱ्हाड पाण्यात पडली आहे ' तेव्हा देवी बोलते 'काळजी करू नको' मी तुला तुझी कुऱ्हाड काढून देते असे म्हणत देवी नदीत जाते व सोन्याची कुऱ्हाड आणते व त्याला देते त्यावर लाकूडतोड्या म्हणतो 'नाही ही माझी कुऱ्हाड नाही.'
देवी पुन्हा नदीत जाते व चांदीची कुऱ्हाड आणते व त्याला देते त्यावर लाकूडतोड्या म्हणतो 'नाही ही माझी कुऱ्हाड नाही ' मग ती देवी लोखंडाची कुऱ्हाड आणते व त्याला देते. तेंव्हा लाकूडतोड्या खुश होऊन म्हणतो ही माझीच कुऱ्हाड आहे. लाकूडतोड्याचा हा प्रामाणिकपणा बघून देवी त्याच्यावर प्रसन्न होते व त्याला सोन्याची व चांदीची अशा दोन्ही कुऱ्हाडी बक्षीस म्हणून देते.
तात्पर्य :- प्रामाणिक पणाचे फळ नेहमी चांगलेच मिळते.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
कष्टाचे फळ | मराठी बोधकथा | marathi bodhakatha | Kashtache Fala
0 टिप्पण्या