सोन्याची अंडे देणारी कोंबडी
एका गावात एक खूप गरीब शेतकरी रहात असतो. आपला उदरनिर्वाह करण्यासाठी तो एक कोंबडी विकत घेतो. जेणेकरून कोंबडी पासून मिळणारे अंडे विकून तो त्यापासून पैसे मिळवू शकतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने आणलेल्या कोंबडीने एक सोन्याचे अंडे दिले होते. ते सोन्याचे अंडे बघून शेतकरी आश्चर्यचकित झाला व त्याला खूप आनंद झाला. त्याने ते अंडे बाजारात नेऊन विकले त्या बदल्यात त्याला खूप पैसे मिळाले.
दुसऱ्या दिवशीही तसेच झाले. त्याने परत ते अंडे बाजारात विकले. अशा प्रकारे ती कोंबडी रोजच एक सोन्याचे अंडे देऊ लागली व तो ते बाजारात विकू लागला. रोज मिळणाऱ्या पैशांमुळे त्याची परिस्थिती बदलू लागली व तो चांगले व आनंदी जीवन जगू लागला.
एकदा त्याच्या मनात विचार येतो की, 'कोंबडी जर रोज एक सोन्याचे अंडे देत असेल तर तिच्या पोटात कितीतरी सोन्याची अंडी असतील' व आपण जर कोंबडीला मारून तिच्या पोटातील सर्व अंडी काढून विकली तर आपण खूप श्रीमंत होऊ. या हव्यासापायी तो त्या कोंबडीला मारतो. पण कोंबडीच्या पोटात त्याला एकही सोन्याचे अंडे सापडत नाही. तो खूप उदास होतो कारण कोंबडी मेल्यामुळे त्याला रोज मिळणारे सोन्याचे अंडे मिळणेही बंद झाले.
तात्पर्य - जेवढे आपल्याला मिळते त्यातच समाधान मानावे, कोणत्याही गोष्टींची जास्त हाव करू नये.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
प्रामाणिक लाकूडतोड्या | मराठी बोधकथा | marathi bodhakatha | Pramanik Lakudtodya
0 टिप्पण्या