स्वाध्याय । पाठ ६. अश्मयुग दगडाची हत्यारे । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग २ | Ashmayug Dagadachi Hatyare Swadhyay 5vi

 स्वाध्याय । पाठ ६. अश्मयुग : दगडाची हत्यारे


१. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा .

(अ) ज्या काळातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात, त्या काळाला आपण ........ असे म्हणतो.

(ताम्रयुग, लोहयुग, अश्मयुग )

👉 ज्या काळातील हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगडाची हत्यारे मिळतात, त्या काळाला आपण अश्मयुग असे म्हणतो.

(आ) महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिकजवळचे .......... हे स्थळ प्रसिद्ध आहे .

(गंगापूर, सिन्नर, चांदवड)

👉 महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळांपैकी नाशिकजवळचे गंगापूर हे स्थळ प्रसिद्ध आहे 


२. खालीलपैकी मध्याश्मयुगीन स्थळांची चुकीची जोडी ओळखा.

(अ) राजस्थान - बागोर

(आ) मध्य प्रदेश - भीमबेटका

(इ) गुजरात - लाधणज

(ई) महाराष्ट्र - विजापूर

👉 (ई) महाराष्ट्र - विजापूर 


३. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तर लिहा.

आघात तंत्राचा वापर मानवाने कसा केला ?

👉 1. एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे याला 'आघात तंत्र' असे म्हणतात.

2. आघात तंत्राचा वापर करून मानवाने तोड हत्यारे तयार केली.

3. दगडाचे छोटे छिलके काढण्यासाठी त्याने सांबरशिंगासारख्या वस्तूंचा घन वापरला.

अशा प्रकारे अघात तंत्राचा वापर मानवाने केला.

(आ) बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात कोणती क्रांती केली?

👉 1. दगडांपासून लांब, पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले.

2. या लांब पात्यांपासून सुरी, तासणी, टोच्या, छिन्नी यांसारखी विविध प्रकारची हत्यारे आणि वस्तू तयार केल्या. 


४. पुराश्मयुग, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग या तीन कालखंडांतील हत्यारांची तुलना करा.

👉 मानवाने या कालखंडात त्यांच्या गरजेनुसार हत्यारे तयार केली. हत्यारांमध्ये प्रगती होत गेली. प्रत्येक युगात मानवाने तयार केलेल्या हत्यारांची तुलना पुढीलप्रमाणे 

पुराश्मयुग :-

या युगातील सुरुवातीला मानवाने आघात तंत्राचा वापर केला व त्यापासून दगडी हत्यारे बनवली. या हत्यारांचा एकाच बाजूला धारा असे. तसेच कुशल मानवाने अशा चाचण्या, जोडहत्यारे बनवली. ही हत्यारे ओबडधोबड असत. परंतु ताठ कण्याचा मानवाने पसरट पात्याची कुऱ्हाड, फरशी अशी प्रमाणबद्ध हत्यारे तयार केली. शक्तिमानवाने लहान आकाराची हत्यारे तयार केली. बुद्धिमानवाने हत्यारे तयार करण्याच्या तंत्रात क्रांती घडवून आणली. त्याने लांब दगडी पातं पासून सुरी, तासणी, टोच्या, छिन्नी अशी हत्यारे तयार केली

मध्याश्मयुग :-

या युगातील मानव शिकारीसाठी टोकासारखे दगडी सूक्ष्मास्त्रे बनवली. मासेमारीसाठी गळ तयार केले. दातेरी सुरी यासारखी अवजारे बनवणे

नवाश्मयुग :-

या युगातील मानव प्रगत तंत्रज्ञान अवगत असणारा होता. त्याने घासून गुळगुळीत केलेले दगडाची हत्यारे तयार केले.


५. पुढीलपैकी कोणत्या आधुनिक यंत्रामध्ये दगडाचा वापर केला जातो.

(अ) मिक्सर 

(आ) पिठाची गिरणी

(इ) मसाला कांडप यंत्र 

👉 पिठाची गिरणी.


हे पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय । पाठ ५. मानवाची वाटचाल  ।  इयत्ता :- ५ वी ।  विषय :- परिसर अभ्यास भाग २ | Swadhyay Manvachi Vatachal 5vi

स्वाध्याय । पाठ ७. निवारा ते गाव वसाहती । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग २ | Swadhyay Nivara Te Gav Vasahati 5vi

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या