स्वाध्याय । पाठ १९. अन्नघटक । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Swadhyay Annaghatak 5vi

 स्वाध्याय । पाठ १९. अन्नघटक



१. काय करावे बरे ?

शरीराला पुरेशी प्रथिने मिळायला हवीत.

👉 शरीराच्या वाढीसाठी आणि झीज भरून निघण्यासाठी भरपूर प्रमाणात प्रथिने आहारात असावी लागतात. यासाठी वेगवेगळ्या प्रकारची प्रथिने जसे, अंडी मासे हे मांसाहारी लोकांसाठी प्रथिनांचे स्रोत, तर शाकाहारी लोकांसाठी वेगवेगळ्या डाळी, चणे, पनीर, सोयाबीन हे प्रथिनांचे स्रोत आहारात असले पाहिजेत. रोजच्या जेवणात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश असावा. त्यामुळे प्रथिने व जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात शरीराला मिळतात.


२. जरा डोके चालवा.

रोज दूध प्यायला का सांगतात.

👉 1. दुधामध्ये जवळजवळ सर्वच अन्नघटक असतात. 

2. कर्बोदकांपैकी शर्करा, प्रथिने व स्निग्ध पदार्थ असतात. 

3. जीवनसत्त्वे 'ए', 'बी' व 'डी' असतात. 

4. दुधात कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असते. 

5. दुधामुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. 

6. दुधाने शरीराची वाढ व विकास जलद होतो. 

म्हणून रोज दूध प्यायला सांगतात.


३. खालील प्रत्येक अन्न घटकाचे दोन स्त्रोत सांगा.

(अ) खनिजे 

👉 1. फळे  2. मोड आलेली कडधान्ये 

(आ) प्रथिने

👉 1. शेंगदाणे   2. दूध 

(इ) पिष्टमय पदार्थ 

👉 1. बटाटे  2. ज्वारी 


४. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

(अ) ............ मुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते 

👉 जीवनसत्वा मुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते 

(आ) कॅल्शियममुळे आपली हाडे ......... होतात.

👉 कॅल्शियम मुळे आपली हाडे मजबूत होतात.

(इ) गोड लागणाऱ्या अन्न पदार्थांमध्ये विविध प्रकारच्या ......... असतात.

👉 गोड लागणाऱ्या अन्न पदार्थांमध्ये विविध प्रकारच्या शर्करा असतात.

(ई) सर्व अन्नघटकांचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला .......... आहार म्हणतात.

👉 सर्व अन्नघटकांचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला संतुलित आहार  म्हणतात.


५. प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) पिष्टमय पदार्थांच्या पचनातून मिळालेल्या शर्करेचा शरीराला काय उपयोग होतो ?

👉 पिष्टमय पदार्थांच्या पचनातून मिळालेल्या शर्करेचे शरीरात मंद ज्वलन होते. या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा उपयोग शरीराच्या विविध कामांसाठी होतो. शरीर गरम ठेवण्यासाठी देखील ही ऊर्जा उपयोगी असते. अशा रितीने ही शर्करा शरीरासाठी इंधन पुरवते.

(आ) तंतूमय पदार्थाचे स्त्रोत कोणते ?

👉 पालेभाज्या , कडधान्ये, धान्य, भाज्यांच्या शीरा तसेच साली हे तंतुमय पदार्थांचे स्त्रोत आहेत.

(इ) कर्बोदके कशाला म्हणतात ?

👉 पिष्टमय पदार्थ, शर्करा व तंतुमय पदार्थ यांना एकत्रितपणे कर्बोदके असे म्हणतात.

(ई) कुपोषण कशाला म्हणतात ?

👉 एखाद्या व्यक्तीच्या आहारात काही अन्नघटकाची कमतरता राहिली, तर शरीराचे योग्य पोषण होत नाही यालाच कुपोषण असे म्हणतात.


६. जोड्या जुळवा.

👉 






हे पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय । पाठ १८. पर्यावरण आणि आपण । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Swadhyay Paravaran Ani Apan 5vi 

स्वाध्याय । पाठ २०. आपले भावनिक जग । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Swadhyay Apale Bhavanik Jag 5vi 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या