अति तेथे माती | मराठी बोधकथा | marathi bodhakatha | Ati Tethe Mati

 अति तेथे माती | मराठी बोधकथा



एका गावात एक भिकारी राहत होता. तो दरोरोज भिक मागून त्याचा उदरनिर्वाह करायचा. त्याला जे मिळेल तो खायचा नाही मिळाले तर पाणी पिऊन आपले जीवन जगत असे. आणि हो महत्वाचे म्हणजे तो भीक मागण्या बरोबरच तो दिवसभर देवाचे नामस्मरण करायचा अशी त्याची दिनचर्या होती. 


देवाला त्याची दया आली व एक दिवस देव त्यावर प्रसन्न झाला व म्हणाला तुला काय हवे ते माग भिकऱ्याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला ' मोहरा कशात घेणार ?' 


भिकाऱ्याने झोळी पुढे केली. मोहरा झोळीत टाकण्यापूर्वी देव म्हणाला 'मी तुझ्या झोळीत मोहरा टाकत जाईल जेव्हा तू थांब म्हणशील तेव्हाच मी थांबेल. पण हे लक्षात ठेव जर तुझ्या झोळीतून एक जरी मोहर खाली जमीनीवर पडली तर त्याची माती होईल.' भिकाऱ्याने जेव्हा अट मान्य केली. देव भिकाऱ्याच्या झोळीत मोहरा ओतू लागला हळूहळू झोळी भरत आली पण भिकाऱ्याला सोन्याचा मोह आवरेना. मोहरांच्या वजनाने झोळी फाटू शकते हे त्याच्या लक्षात येऊनही तो थांब म्हणत नव्हता.


शेवटी जे व्हायचे तेच झाले. त्याची झोळी फाटली व त्यातील सर्व सोन्याच्या मोहरा खाली पडतात व त्याची माती होते. त्याचबरोबर देवही नाहीसा होतो व त्याच्याजवळ रडण्याशिवाय काहीच उरत नाही. आणि शेवटी समाधानी वृत्ती नसल्यामुळे तो भिकारी पुन्हा गरीब व भिकारीच रहातो.. 


तात्पर्य- कोणत्याही गोष्टीचा अति लोभ करू नये.


हे पण वाचा 👇👇👇👇👇

लोभी कुत्रा | मराठी बोधकथा | marathi bodhakatha | Lobhi Kutra

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या