लोभी कुत्रा | मराठी बोधकथा
एकदा एका कुत्र्याला खूप भूक लागलेली होती. तेव्हा त्याला रस्त्याने चालताना एक पोळी सापडते. त्याला एकट्यालाच ती पोळी खायची होती. त्यामुळे सर्वांच्या नजरा चुकवून आपल्या तोंडात पोळी धरून तो धावू लागला.
धावता धावता तो एका पुलावर येऊन थांबला. पुलाखाली खूप पाणी होते. कुत्र्याने पाण्यात बघितले तर त्याला पाण्यात आणखी एक कुत्रा दिसला व त्याच्याही तोंडात पोळी होती. त्याला असे वाटले की पाण्यातील त्या कुत्र्याच्या तोंडातील पोळी आपण हिसकावून घ्यावी.
त्यामुळे तोंड उघडून पाण्यातील त्या कुत्र्यावर भुंकू लागला भुंकण्यासाठी तोड उघडताच त्याच्यात तोंडातील पोळी पाण्यात पडली व त्याला उपाशी रहावे लागले.
तात्पर्य :- दुसऱ्याकडे न बघता स्वतःकडील गोष्टीमध्ये समाधान मानावे.
0 टिप्पण्या