स्वाध्याय । पाठ २०. आपले भावनिक जग
१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(अ) माणूस विचारक्षम असतो, तसाच तो ........ असतो.
👉 माणूस विचारक्षम असतो, तसाच तो भावनाशील असतो.
(आ) आपल्या मित्र मैत्रिणींनमध्ये जे ....... गुण आहे, त्यांचा प्रथम विचार करावा.
👉 आपल्या मित्र मैत्रिणींनमध्ये जे चांगले गुण आहे, त्यांचा प्रथम विचार करावा.
२. पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) व्यक्तिमत्व संतुलित कसे बनते ?
👉 भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे व्यक्तिमत्व संतुलित बनते.
(आ) समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कशामुळे कमी होते ?
👉 आपण रागवत नियंत्रण ठेवले नाही तर, समंजसपणा व सहकार्याची वृत्ती कमी होते.
(इ) आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर आपण काय केले पाहिजे ?
👉 आपल्या स्वभावातील दोषांची जाणीव झाल्यानंतर आपण ते दोष दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
३.पुढील प्रश्नांची ३ ते ४ वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) भावनिक समायोजन म्हणजे काय ?
👉 माणूस हा विचारक्षम असतो, तसाच तो भावनाशील असतो. आपले विचार आणि भावना यांचा योग्य मेळ घालत आला पाहिजे. त्या योग्य प्रमाणात व योग्य रीतीत व्यक्त करणे यालाच भावनिक समायोजन असे म्हणतात.
(आ) रागाचे कोणते दूषपरिणाम होतात ?
👉 1. समंजसपणा व सहकार्य वृत्ती कमी होते.
2. रागाच्या भरात आपण इतरांचे मन दुखावतो.
3. आपल्याला निद्रानाश तसेच डोकेदुखी असा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते
४. तुम्हाला काय वाटते ते लिहा.
(अ) तुमचे म्हणणे शिक्षक ऐकून घेत नाही.
👉 ........
(आ) घरातील निर्णय घेतांना आई बाबा तुम्हालाही विचारतात.
👉 मला आनंद होतो.
(इ) मित्राला मोठे बक्षीस मिळाले.
👉 माझ्या मित्राला बक्षीस मिळाल्याचा मला अभिमान वाटेल व तसेच मीही प्रयत्न करेल की मलाही असे बक्षीस मिळावे.
(ई) वर्गातील मुले तचे खूप कौतुक करतात.
👉 मला खूप आनंद होतो व प्रेरणा मिळाले.
५. तुम्ही या प्रसंगी काय कराल ?
(अ) रोहिणीला निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाला.
👉 रोहिणीचे मी अभिनंदन करेल. तिने निबंध कसा लिहिला हे तिला विचारेल. तसेच सुंदर निबंध कसा लिहावा हे तिला विचारेल.
(आ) कविताला राग आल्यामुळे तिने डब्बा खाल्ला नाही.
👉 कविताला राग का आला याचे कारण शोधून त्याची शहानिशा करेल. तिला अन्नावर राग काढू नको असे सांगून डब्बा खाण्यास सांगेल.
(इ) वीणा शाळेत एकटी वावरते.
👉 मी वीणाशी मैत्री करेल व तिला आमच्या सोबत सामावून घेईल.
(ई) मकरंद म्हणतो माझा स्वभावच हट्टी आहे.
👉 मी त्याला स्वभाव बदलण्याचा सल्ला देईल. तसेच तो त्याच्या हट्टी स्वभावामुळे स्वतःचे कसे नुकसान करून घेत आहे हे समजावून सांगेल.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
स्वाध्याय । पाठ १९. अन्नघटक । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Swadhyay Annaghatak 5vi
0 टिप्पण्या