स्वाध्याय । पाठ ११. आपले घर व पर्यावरण । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Swadhyay Aple Ghar Va Paryavaran 5vi

 स्वाध्याय । पाठ ११. आपले घर व पर्यावरण 




१. (अ) पर्वतीय प्रदेशात खालीलपैकी कोणते घर योग्य ठरेल? योग्य ठिकाणी '' करा. त्यामागचे कारण लिहा. 


👉 

1. पर्वतीय प्रदेशात वाऱ्याचे, थंडीचे व पावसाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पर्वतीय प्रदेशात शेण मातीने सारवलेले, गवतांच्या छपरांचे, बहुमजली कच्चे घर  योग्य ठरत नाही तर सिमेंट, विटा, कौले इत्यादी साहित्य वापरून बनवलेले भक्कम घर योग्य ठरते . 

2. पर्वतीय प्रदेशात तुलनेने कमी सपाट प्रदेश आढळतो. त्यामुळे पर्वतीय प्रदेशात मोठ्या आकाराचे घर योग्य ठरत नाही, तर तुलनेने लहान आकाराचे, बहुमजली व पक्के घर योग्य ठरते.


(आ) बहुमजली घर बांधताना मुख्यतः कोणते साहित्य वापरतात ? योग्य पर्याय निवडा.

(अ) वाळू/कोळसा / सिमेंट/विटा.

(ब) सिमेंट/विटा/कापूस / लोखंड.

(क) लोखंड / सिमेंट/वाळू/विटा.

👉 (क) लोखंड / सिमेंट/वाळू/विटा.


२. घरे बांधताना खालील बाबींना तुम्ही कसा प्राधान्यक्रम दयाल ?

(अ) आराम

(आ) रचना

(इ) हवामान 

👉 घरे बांधताना वरील बाबींना मी पुढील प्रमाणे प्राधान्य देईल 

1. हवामान 

2. आराम

3. रचना 


३. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) तुमच्या घरातील कोणत्या बाबी पर्यावरणपूरक आहेत, त्यांची यादी करा.

👉 1. सौरचूल 

2. पावसाचे पाणी साठवण्यासाठी घरामागील अंगणात बांधलेला हौद.

3. ओल्या कचऱ्याचा वापर करून खत बनवण्यासाठी वापरण्यात येणारा मातीचा जुना मोठा माठ.

4. घरासमोरील अंगणातील फुलझाडे

5. घरातील मोठ्या खिडक्या

(आ) घरातील कोणती उपकरणे आपण सौरऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो ?

👉 1.पंखा

2. दिवे

3. घड्याळ

4. कुकर

5. गीझर इत्यादी..


४. बांधकामाच्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे प्रदूषण आढळते?

👉 बांधकामाच्या ठिकाणी आढळणारे प्रदूषण पुढील प्रमाणे.

1. जल प्रदूषण

2. वायू प्रदूषण 

4. मृदा प्रदूषण 

4. ध्वनी प्रदूषण .


हे पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय ।  पाठ १०. ओळख भारताची ।  इयत्ता :- ५ वी ।  विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Olakh Bharatachi Swadhyay 5vi 

स्वाध्याय । पाठ १२. सर्वांसाठी अन्न । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Swadhyay sarvansathi ann 5vi 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या