स्वाध्याय । पाठ ५. मानवाची वाटचाल । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग २ | Manvachi Vatachal Swadhyay 5vi

 स्वाध्याय । पाठ ५. मानवाची वाटचाल


१. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

(अ) लॅटिन भाषेत ...... या शब्दाचा अर्थ आहे मानव

👉 लॅटिन भाषेत होमो या शब्दाचा अर्थ आहे मानव.

(आ) शक्तिमान मानव प्रामुख्याने ........ मध्ये वस्ती करत होता.

👉 शक्तिमान मानव प्रामुख्याने गुहा मध्ये वस्ती करत होता.


२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) हात कुऱ्हाड कोणी बनवली ?

👉 ताठ कनाच्या मानवाने हात कुऱ्हाड बनवली.

(आ) आनुवांशिकता म्हणजे काय ?

👉 माणसाचे रंगरूप, आरोग्यविषयक वैशिष्ट्ये, इत्यादी बाबी त्याच्या त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शविणाऱ्या असतात या सर्वांनाच आनुवंशिकता असे म्हणतात. 


३. पुढील विधानांची कारणे लिहा.

(अ) शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले.

👉 1. आफ्रिका खंडातून आशिया- युरोपात केलेल्या स्थलांतरामुळे पर्यावरणातील बदलांशी त्याला जुळवून घेता आले नाही. 

2. बुद्धिमान मानवाच्या समूहांबरोबरच्या संघर्षात त्याचा टिकाव लागला नाही म्हणून शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले.

(आ) बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता.

👉 1. बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते. 

2. त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचनाही विकसित झाली होती. 

3. त्याला लवचीक जीभही लाभली होती म्हणून बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता.


४. पुढील शब्दकोडे सोडवा.


👉 


हे पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय । पाठ ४. उत्क्रांती । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग २ | Swadhyay Utkranti 5vi

स्वाध्याय । पाठ ६. अश्मयुग दगडाची हत्यारे । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग २ | Swadhyay Ashmayug Dagadachi Hatyare 5vi

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या