स्वाध्याय । पाठ १६. पाणी
१. काय करावे बरे ?
जमिनीच्या उतारामुळे बागेतील माती पाण्याबरोबर वाहून जात आहे.
👉 जमिनीच्या उतारावर छोट्या झुडपांचे रोपण करावे. गवताची बियाणेदेखील रुजवता येईल यामुळे माती वाहून जाणार नाही. बागेला पाणी घालताना हलकेच शिंपडावे.
२. जरा डोके चालवा.
पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी रस्ते व पादचारी मार्ग कसे बांधावे ?
👉 संपूर्ण रस्त्याचे आणि पदपथांचे काँक्रीटीकरण केल्यास पदपथावर आणि पादचारी मार्गावर मध्यभागी रस्ता किंचित उंच असावे त्यामुळे पाणी रस्त्याच्या बाजूला निघून जाईल तसेच रस्त्याच्या मध्ये थोडी भेग राखल्यास त्यातूनही पावसाचे पाणी आत मुरेल.
३. प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) दुष्काळात कोणती परिस्थिती निर्माण होते ?
👉 1. पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते.
2. शेतीला पाणी न मिळाल्याने पिके करपुन जातात.
3. दुष्काळ पडलेल्या भागातील माणसांना अन्न व पाण्यासाठी स्थलांतर करावे लागते.
4. काही ठिकाणी पिण्यासाठी शुद्ध पाणीही उपलब्ध नसते.
(आ) पावसाळ्यानंतरही पाणी उपलब्ध होण्यासाठी शासन आणि नागरिक कोणती कामे करतात ?
👉 लहान तलावांची निर्मिती करणे; उतारावर लहान बंधारे बांधणे; आडवे चर खणणे; गावातील ओढे, नाले यांवर बांध घालून पाणी अडवणे अशी कामे शासन व नागरिक एकत्र येऊन करतात.
(इ) पावसाचे पाणी कशासाठी अडवावे लागते ?
👉 पावसाचे पाणी अडवून ठेवल्यामुळे, पावसाळ्याच्या काळानंतरही पाणी उपलब्ध होते. अडवलेले पाणी जमिनीत जिरून भूजलाचा साठा वाढतो. विहिरी पाण्याने भरलेल्या राहतात आणि दुष्काळाची शक्यता कमी होते.
(ई) जलव्यवस्थापन कशाला म्हणतात ?
👉 पावसाळ्यानंतरही पावसाचे पाणी वापरण्यासाठी उपलब्ध राहील अशी सोय करणे याला 'जलव्यवस्थापन' असे म्हणतात.
४. चूक की बरोबर ते सांगा. चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.
(अ) पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर मिळते.
👉 चूक.
दुरुस्त विधान - पावसाचे पाणी आपल्याला वर्षभरातून फक्त चार महिनेच मिळते
(आ) शासनातर्फे दुष्काळग्रस्त भागांतील लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षित जागी तात्पुरते हालवले जाते.
👉 बरोबर.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
0 टिप्पण्या