स्वाध्याय । पाठ १२. सर्वांसाठी अन्न
१. काय करावे बरे ?
कुंडीतील रोप वाढत नाही.
👉 1. रोपाला भरपूर सूर्यप्रकाश मिळावा अशी व्यवस्था करावी.
2. कुंडीत सेंद्रिय खते घालावीत.
3. रोजच्या रोज, शक्यतो सकाळी रोपाला पाणी घालावे..
4. मुळातली माती मोकळी करावी.
5. रोपावर कीड अथवा परजीवी नाहीत याची खात्री करून घ्यावी.
या सर्व बाबी व्यवस्थित केल्यास रोपाची व्यवस्थित वाढ होईल.
२. जरा डोके चालवा.
घरामध्ये अन्नधान्याचा साठा कशासाठी केलेला असतो ?
👉 1. रोज रोज बाजारात जाणे टाळता यावे म्हणून घरामध्ये एकदम अन्नधान्य अन्नधान्य आणून ठेवतात.
2. काही पदार्थ ठराविक हंगामातच मिळतात त्यांना टिकवून व पुरवून वापरून वापरावे लागते.
3. आयत्यावेळी दुकाने बाजार बंद असेल तर गैरसोय होते म्हणूनही अन्नधान्याचा साठा केलेला असतो.
4. घरात पाहुणे येणार असतात त्यामुळेही अन्नधान्याचा साठा केलेला असतो.
३. चूक की बरोबर ते सांगा. चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा.
(अ) शेती करण्याची फक्त एकच पद्धत आहे.
👉 चूक - शेती करण्याच्या अनेक पद्धती आहेत.
(आ) आपला भारत देश शेतीप्रधान आहे.
👉 बरोबर.
(इ) सुधारित बियाणांच्या वापरामुळे उत्पादन वाढत नाही.
👉 चूक - सुधारित बियाण्यांच्या वापरामुळे उत्पादन वाढते.
४. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) सुधारित बियाणांच्या वापरामुळे कोणकोणते फायदे होतात ?
👉 1. सुधारित बियाणे अधिक पीक देतात.
2. सुधारित बियाणांची पिके झपाट्याने वाढतात.
3. काही प्रकारची बियाणे कमी पाण्यातही भरघोस पीक देतात.
(आ) सिंचनाच्या सुधारित पद्धती कोणत्या ? त्यांचे फायदे कोणते ?
👉 1. ठिबक सिंचन हे व तुषार सिंचन या सिंचनांच्या सुधारित पद्धती आहेत.
2. आधुनिक सिंचनामुळे पिकांच्या मुळांना आवश्यक तेवढे पाणी मिळते.
3. पाण्याची बचत करता येते व उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर करता येतो.
(इ) ठिबक सिंचन पद्धतीचे वर्णन करा.
👉 ठिबक सिंचन पद्धतीत पिताना थेंब थेंब पाणी देण्यात येते. अशा सिंचनात छिद्रे असलेले पाईप वापरतात. या छिद्रातून पिकांच्या मुळांना पाणी मिळते. उपलब्ध पाण्याचा योग्य व पुरेपूर वापर केला जातो व पाणी वायाही जात नाही.
(ई) कोणकोणत्या कारणांमुळे वाढत्या पिकाचे नुकसान होते ?
👉 1. वाढत्या पिकांवर कीड पडू शकते.
2. अपुरे पाणी मिळाल्यास पिकांच्या वाढीवर परिणाम होतो.
3. काही पिकांना रोग लागू शकतात.
4. जमिनीचे पिके जोमाने वाढत नाही.
यामुळे वाढत्या पिकांचे नुकसान होते.
(उ) पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कोणते उपाय योजतात ?
👉 कीड व रोग जंतूंची लागण थांबवण्यासाठी पिकांवर कीटकनाशके फवारावे . बियाणे देखील पेरण्या अगोदर त्यावर औषध चोळून घ्यावेत. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी हे आपण उपाय करू शकतो
(ऊ) जमिनीचा कस कशामुळे कमी होतो ?
👉 जमिनीत जास्त प्रमाणात रासायनिक खत मिसळल्यास आणि पाण्याचा अतिवापर केल्यास मातीचा किंवा जमिनीचा कस कमी होतो.
(ए) आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीच्या पद्धतीत कोणते बदल झाले आहेत ?
👉 1. आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे सुधारित बियाणे वापरण्यात येते.
2. जलसिंचनाच्या आधुनिक पद्धती वापरण्यात येतात.
3. योग्य प्रमाणातील सेंद्रिय खते वापरून उत्पादन क्षमता वाढवतात.
4. कीटकनाशकांचा सुयोग्य वापर करून पिकांची सुरक्षा करण्यात येते.
(ऐ) कोणकोणत्या पद्धतीने धान्य टिकवता येते ?
👉 1. धान्य साठवणींच्या जागी कीटकनाशकांचा फवारा मारतात.
2. कडुलिंबाचा पाला वापरून धान्य टिकवता येते.
3. संरक्षक रसायने धान्यात मिसळून ठेवतात. अशा रसायनांच्या वासाने धान्याला कीड लागत नाही.
4. साठवणीच्या जागी हवा खेळती ठेवतात..
(ओ) शेतीसाठी पाणी कोठून उपलब्ध केले जाते ?
👉 1. भारतातली बहुतेक शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते.
2. पावसाबरोबरच नदी, तलाव व विहिरी यांतील पाण्याचा उपयोग केला जातो.
3. नदयांवर धरणे बांधून आणि पावसाचे पाणी अडवून केलेल्या पाणीसाठ्यातूनही शेतीसाठी पाणी वापरले जाते.
५. जोड्या जुळवा.
👉
हे पण वाचा 👇👇👇👇👇
0 टिप्पण्या