स्वाध्याय । पाठ ८. स्थिर जीवनाची सुरुवात
१. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.
(अ) शेतीचे सुमारे अकरा हजार वर्षांपूर्वीचे पुरावे प्रथम इस्राईल आणि .......... येथे सापडले आहेत.
( इराण, इराक, दुबई )
👉 शेतीचे सुमारे अकरा हजार वर्षांपूर्वीचे पुरावे प्रथम इस्राईल आहे इराक येथे सापडले आहेत.
(आ) नवाश्मयुगाच्या सुरुवातीला ........ घरे बांधली जात होती.
( मातीची, विटांची, कुडाची )
👉 नवाश्मयुगाच्या सुरुवातीला कुडाची घरे बांधली जात होती.
२. पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
(अ) एखादी प्राणिजात माणसाळविण्याच्या प्रक्रियेच्या तीन मुख्य पायऱ्या कोणत्या ?
👉 एखादी प्राणिजात माणसाळविण्याच्या प्रक्रियेच्या तीन मुख्य पायऱ्या पुढील प्रमाणे :-
1. रानातील जनावरांना पकडून ताब्यात घेणे.
2. त्या जनावरांना माणसासोबत राहण्याचे वळण लावणे.
3. त्यांच्याकडून दूध दुभत्यासारखे वस्तू मिळविणे व त्यांच्याकडून कष्टाची कामे करवून घेणे.
(आ) समूहातील स्त्री - पुरुषांतून कारागीर कसे तयार झाले ?
👉 शेतीमुळे मानवाला स्थिरता मिळाली. स्थिरतेमुळे पिकलेले अन्न जास्त काळासाठी साठवता येणे शक्य झाले. समूहातील काही स्त्री - पुरुष नवीन गोष्टींचा शोध घेऊ लागले व अंगाच्या कल्पकतेच्या आधारे नवीन कौशल्य आत्मसात केलेल्या व्यक्तींकडे त्यांच्या विशिष्ट कौशल्यावर आधारित कामे सोपवली गेली. यातूनच समूहातील स्त्री - पुरुषांतून कारागीर तयार झाले.
३. संकल्पना चित्र तयार करा.
👉
हे पण वाचा 👇👇👇👇👇
0 टिप्पण्या