स्वाध्याय । पाठ ४. उत्क्रांती । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग २ | Utkranti Swadhyay 5vi

 स्वाध्याय । पाठ ४. उत्क्रांती


१. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा.

(अ) उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा ................. या शास्त्रज्ञाने मांडली.

(चार्ल्स डार्विन, विलार्ड लिबी, लुई लिकी)

👉 उत्क्रांतीची संकल्पना पहिल्यांदा चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने मांडली.

(आ) पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे ............... प्राणी होय.

( जलचर, उभयचर, सस्तन )

👉 पृष्ठवंशीय प्राण्यांच्या वर्गातील सर्वाधिक उत्क्रांत टप्पा म्हणजे सस्तन प्राणी होय.


२. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

(अ) पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना काय म्हणतात ?

👉पाणी व जमीन या दोन्ही ठिकाणी वावरणाऱ्या प्राण्यांना उभयचर प्राणी असे म्हणतात.

(आ) आदिमानवाची प्रजाती प्रथम कोठे अस्तित्वात आली ?

👉 आदिमानवाची प्रजाती प्रथम आफ्रिका खंडामध्ये अस्तित्वात आली.


३. पुढील विधानांची कारणे लिहा.

(अ) डायनोसॉरच्या महाकाय प्रजाती नष्ट झाल्या.

👉 कारण, बदलत्या पर्यावरणाशी न जुळवून घेणाऱ्या प्रजाती कालांतराने नष्ट होतात. काही वेळा अचानकपणे निसर्गात मोठी संकते येतात, काही वेळा पर्यावरणात आकस्मिक बदल होतात. अशा कारणामुळे डायनोसॉर च्या प्रजाती नष्ट झाले

(आ) मूळ प्रजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी एक नवीन प्रजाती उदयाला येते.

👉 एखाद्या विशिष्ट प्राणी जातींमधील प्राण्यांच्या मूळ शरीररचनेत पर्यावरणाशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात काही अंतर्गत बदल घडून येतात. कालांतराने हे बदल त्या प्राणीजातीचे अनुवंशिक रूप धारण करतात, अशा रीतीने मूळ प्राणीजातीपेक्षा काही वेगळी वैशिष्ट्ये असणारी नवीन प्राणी जाती उदयाला येते.


४. दिलेल्या संकल्पनाचित्रातील रिकाम्या जागा भरा.

👉

हे पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय । ३. पृथ्वीवरील सजीव ।  इयत्ता :- ५ वी ।  विषय :- परिसर अभ्यास भाग २

स्वाध्याय । पाठ ५. मानवाची वाटचाल । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग २ | Swadhyay Manvachi Vatachal 5vi

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या