स्वाध्याय । पाठ १४. वाहतूक
१. वाहतुकीच्या सोईचा तुम्हांला झालेला फायदा, यावर पाच वाक्ये लिहा.
👉 1. वाहतुकीच्या सोईमुळे खर्च व वेळ वाचतो.
2. वाहतुकीच्या सोयीमुळे मालाची व प्रवाशांची चलन क्षमता वाढते.
3. उद्योग धंदे, बाजारपेठा यांचा विकास होतो.
4. वाहतुकीच्या सोयीमुळे रोजगाराची संधी प्राप्त होते.
5. वाहतुकीच्या सोयीमुळे पर्यटन स्थळांचा विकास होतो.
२. वाहतुकीच्या सोईमुळे आपल्या परिसरात उपलब्ध झालेल्या चार सुविधा लिहा.
👉 1. वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे शाळा, कॉलेज, व इतर कामांसाठी करावा लागणारा प्रवास कमी वेळेत घ्यायला लागला.
2. मालाची दळण वळण करणे सोपे झाल्यामुळे जवळच बाजारपेठा निर्माण झाल्या.
3. बाजारपेठा निर्माण झाल्यामुळे वस्तू लवकर व जलद गतीने मिळणे सुकर झाले.
4. वाहतूक यंत्रणे मध्ये रोजगाराची संधी वाढू लागल्या.
३. आपल्या परिसरातील वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी चार उपाय लिहा.
👉 1. वाहतुकी वरील ताण कमी करण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे योग्य पालन करणे.
2. वाहतुकीच्या नियमांचे शिक्षण देणे व तशी अंमलबजावणी करणे.
3. वाहतूक नियमांचा प्रचार व प्रसार करून रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची संख्या टाळणे.
4. तसेच वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या सरकारी किंवा स्वतःच्या वाहनांची योग्य देखभाल करणे जेणेकरून प्रदूषणाला आळ बसेल.
४. तुमच्या परिसरातील सर्वांत कमी प्रदूषण असलेला भाग शोधा. हा भाग कमी प्रदूषित असण्यामागची कारणे लिहा ?
👉 कमी प्रदूषण असलेला भाग म्हणजे गालापासून दूर अंतरावर टेकडीवर असलेला शिवमंदिराचा परिसर होय.
तेथील पप्रदूषण कमी असल्याची कारणे :-
1. टेकडीच्या व शिवमंदिराच्या परिसरात लोकसंख्या खूप कमी आहे.
2. तेथील लोक अत्यंत कमी प्रमाणात वाहनांचा वापर करतात.
3. टेकडीवर व शिवमंदिराच्या परिसरात झाडांची संख्या जास्त आहे.
५. CNG व LPG ची विस्तारित रूपे लिहा.
👉 1. Compressed Natural Gas (उच्च दाबाने साठवलेला मिथेन)
2. Liquefied Petroleum Gas
६.
(अ) वरील चित्रातील प्रदूषण करणारे वाहन कोणते ?
👉 बस.
(आ) या वाहनाचे प्रदूषण कमी करण्याकरिता तुम्ही कोणता उपाय सुचवाल ?
👉 1. वेळोवेळी वाहनाची दुरुस्ती व देखभाल करणे.
2. कमी प्रदूषण करणाऱ्या इंधनाचा वापर करणे.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
0 टिप्पण्या