स्वाध्याय । पाठ २१. कामांत व्यस्त आपली आंतरेंद्रिये । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Swadhyay Kamant Vyast Apali Antarendriye 5vi

 स्वाध्याय । पाठ २१. कामांत

 व्यस्त आपली आंतरेंद्रिये





१. काय करावे बरे ?

चक्कर येऊन व्यक्ती पडली असता लोकांनी त्याच्याभोवती गर्दी केली आहे.

👉 चक्कर येऊन पडलेल्या व्यक्तीभोवती कधीही गर्दी करू नये. चक्कर आलेल्या व्यक्तीच्या भोवती मोकळी हवा असणे गरजेचे असते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला चक्कर आली असेल आणि लोकांनी तिच्याभोवती गर्दी केली असेल तर सर्वात आधी माणसांची ती गर्दी कमी करावी. चक्कर आलेल्या व्यक्तीच्या तोंडावर पाणी शिंपडावे. तरीही त्याला शुद्ध न आल्यास्स्स लगेच वैद्यकीय मदत घ्यावी.


२. जरा डोके चालवा.

(अ) भरभर जेवताना जोराचा ठसका का लागतो?

👉 अन्ननलिका व श्वसन नलिका या दोन्ही नालीकांची सुरुवातीची टोके घशात एकमेकांच्या अगदी जवळ असतात. आपण जेव्हा अन्न गिळतो तेव्हा आपली श्वसननलिका बंद राहते. जेव्हा आपण घाईघाईने जेवत असतो तेव्हा आपण गिळलेले अन्न चुकून श्वसन नलिकेत जाते. हे श्वसन नलिकेत गेलेलं अन्न त्वरित श्वसन नलिकेतून बाहेर फेकले जाते. तेव्हा आपल्याला भरभर जेवताना ठसका लागतो.

(आ) श्वासावाटे शरीरात येणाऱ्या हवेचे शुद्धीकरण कसे होते?

👉 श्वसन इंद्रियांच्या आतील त्वचेला बारीक केसांसारखी लव असते. श्वसनेंद्रीयांच्या आतल्या स्तरावर चिकट बुळबुळीत श्लेष्म असते. हवेतील कण त्यावर चिकटून बसतात. परिणामी हवेतील हानिकारक कण फ्फुफुसापर्यंत पोहचू शकत नाही. अशा प्रकारे श्वासावाटे शरीरात येणाऱ्या हवेचे शुद्धीकरण होते.


३. खालील रिकाम्या जागी योग्य तो शब्द भरा.

(अ) ....... ... वायू शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहचवला जातो.

👉 ऑक्सिजन वायू शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहचवला जातो.

(आ) जठर हे ..... ...... सारखे इंद्रिय असते.

👉 जठर हे पिशवी सारखे इंद्रिय आहे.


४. जोड्या लावा.

👉


५. थोडक्यात उत्तरे लिहा.

(अ) शरीरात कार्य करणाऱ्या संस्थांची नावे लिहा.

👉 पचनसंस्था, चेतासंस्था, रक्ताभिसरणसंस्था,  श्वसनसंस्था , अस्तिसंस्था, उत्सर्जन्संस्था इत्यादी.

(आ) फुप्फुसामध्ये ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साइड वायूंची देवाणघेवाण कशी होते ?

👉  फुप्फुसामध्ये बाहेरील हवा पोहचली, की हवेतील ऑक्सिजन वायूकोशाच्या भोवती असलेल्या बारीक-बारीक रक्तवाहिन्यांत जातो आणि रक्तातून तो शरीराच्या सर्व भागात वाहून नेला जातो. त्याच वेळी शरीराच्या सर्व भागांतून रक्ताबरोबर आलेला कार्बन डायऑक्साईड वायूकोशांमधील हवेत मिसळतो. व उच्छवासावेळी तो शरीराबाहेर टाकला जातो. अशा प्रकारे फुप्फुसामध्ये ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायूंची देवाणघेवाण होते.

(इ) लाळ हा द्राव पाचकरस का आहे ?

👉 टायलीन नावाचा पाचकरस हा लाळेमध्ये असतो. या रसामुळे पिष्टमय पदार्थांचे रुपांतर हे ग्लुकोजमध्ये केले जातो. त्यामुळे अन्नाचे पचन होण्यास मदत होते. म्हणून लाळ हा द्राव पाचकरस आहे.


६. कशाला म्हणतात ते कंसातून शोधा व लिहा.

 ( रक्ताभिसरण, श्वासनलिका, श्वासपटल)

(अ) याच्या वरखाली होणाऱ्या हालचालींमुळे श्वासोच्छ्वास होतो-

👉 श्वासपटल.

(आ) शरीरात सतत रक्त फिरत ठेवण्याची प्रक्रिया-

👉रक्ताभिसरण.

(इ) नाकातून आलेली हवा या नळीत येते -

👉श्वासनलिका.


हे पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय । पाठ २०. आपले भावनिक जग । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Swadhyay Apale Bhavanik Jag 5vi 

स्वाध्याय । पाठ २२. वाढ आणि व्यक्तिमत्व विकास । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Swadhyay Vadh Ani Vyaktimatv Vikas 5vi 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या