9 स्थिर जीवन आणि नागरी संस्कृती
१. पुढील गोलातून वस्तूंच्या काळाच्या वर्गवरीचे तीन गट शोधा व ते संबंधित घटकापुढे लिहा.
👉 (अ) दगडाची हत्यारे अश्म युग.
(आ) तांब्याची हत्यारे व इतर वस्तू ताम्र युग.
(इ) लोखंडाची वस्तू व इतर हत्यारे लोह युग.
२. पुढील घटक काळानुसार योग्य क्रमाने लिहा.
(अ) (१) तांबे (२) सोने (३) लोखंड
👉 (१) सोने (२) तांबे (३) लोखंड
(आ) (१) ताम्रायुग (२) लोहयुग (३) अश्मयुग
👉 (१) अश्मयुग (२) ताम्रयुग (३) लोहयुग
३. पुढील घटकांचे परिणाम लिहा.
(अ) तांबे या धातूचा शोध .....
👉 मानवाला हत्यारे व अवजारे बनवता यायला सोपे झाले.
(आ) चाकाचा शोध .....
👉 मातीच्या सुबक भांडी मोठ्या प्रमाणात तयार करता यायला लागल्या व त्यामुळे व्यापार वाढला.
(इ) लिपीचे ज्ञान .....
👉 व्यापाराच्या आणि उत्पादनाच्या कायमस्वरूपी नोंद ठेवणे शक्य होऊन प्रत्येक संस्कृतीची आपली - आपली वेगळी लिपी तयार झाली.
४. टीपा लिहा.
(अ) धातूचा वापर
👉 मानवाने हत्यारांसाठी आणि अवजारांसाठी केलेल्या धातूच्या वापरावरून ख्रिश्चन ठोमसेन या अभ्यासकाने कालखंडाची अश्मयुग, ताम्रयुग आणि लोहयुग अशी वर्गवारी केली. मानवाने सर्वप्रथम सोने या धातूचा दागिने बनवण्यासाठी वापर केला परंतु सोने निसर्गतः अतिनरम असल्याने अवजारांसाठी त्याचा उपयोग होत नव्हता. त्यानंतर त्याला तांबे या धातूचा शोध लागला. या काळात मानवाने तांबे धातूचा अवजारांसाठी उपयोग मोठ्या प्रमाणवर केल्याने त्या कालखंडाला ताम्रयुग असे म्हणतात. त्यानंतर मानव लोखंडाची हत्यारे वापरू लागल्याने या युगाला लोह्युग असे म्हणतात.
(आ) नागरी समाजव्यवस्था
👉 व्यापारातील भरभराट हे जगभरातील प्राचीन नागैर संस्कृतीचा उदय आणि विकास होण्यामागचे एक प्रमुख कारण होते. परंतु नागरी संस्कृतीचा पाया नवाश्मयुगातील कृषिसंस्कृतीवर आधारलेला होता. कृषिसंस्कृतीत रुजलेल्या श्रद्धा नागरी संस्कृतीतही अबाधित राहिल्या. व्यापाराच्या भरभराटीतून समृद्ध झालेल्या नगरांमध्ये कृषिसंस्कृतीत रुजलेल्या श्रद्धांवर आधारलेले सामुहिक आचार आणी उत्सव यांना अधिक महत्व मिळाले. अनेक नगरमध्ये अतिभव्य मंदिरे उभारली गेली. त्या नगरांच्या शासनव्यवस्थेचे अधिकारही मंदिर प्रमुखाच्या हातांत एकवटले. पुढे मंदिरांचे प्रमुखपद आणि राजपद, ही दोन्ही पडे एकाच व्यक्तीकडे गेली. जगातील प्राचीन नागरी संस्कृतीची ही सुरुवात होती.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
0 टिप्पण्या