10 ऐतिहासिक काळ स्वाध्याय
ऐतिहासिक काळ स्वाध्याय | Aitihasik Kal Swadhyay |
१. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास कोठे झाला ?
👉 नवाश्मयुगीन संस्कृतीचा विकास नद्यांच्या खोऱ्यात झाला.
(आ) हडप्पा संस्कृतीचे कारागीर कोणत्या वस्तू बनवण्यात कुशल होते ?
👉 विविध रंगीत दगडापासून बनवलेले मनी आणि कसे या वस्तू बनवण्यात हडप्पा संस्कृतीचे कारागीर कुशल होते.
२. थोडक्यात उत्तरे लिहा.
(अ) हडप्पा संस्कृतींच्या नगरांची रचना कोणत्या प्रकारची होती ?
👉 1. हडप्पा संकृतीच्या नगरांची रचना आखीव होती.
2. एकमेकांना समांतर, काटकोनात छेडणाऱ्या रस्त्यांमुळे तयार झालेल्या चौकोनी जागेत घरे बांधलेली असत.
3. धान्याची प्रचंड मोठी कोठारे, प्रशस्त घरे, सांडपाणी वाहून नेण्यासाठी झाकलेली गटारे, घरोघरी स्नानगृहे, शौचालये अशी सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणारी व्यवस्थेत नगराचे दोन ते चार स्वतंत्र विधाग असत.
4. प्रत्येक विभागाला स्वतंत्र तटबंदी असे.
या प्रकारची रचना हडप्पा संस्कृतीच्या नगरांची रचना होती.
(आ) नाईल नदीच्या काठाची जमीन अत्यंत सुपीक का झाली ?
👉 नाईल नदीला पावसाळ्यात पुर येतो. हा पूर नदीच्या काठावर गाळ आणून टाकतो. हजारो वर्षांपासून जमा झालेल्या या गाळामुळे नाईल नदीच्या काठाची जमीन अत्यंत सुपीक झाली.
३. पुढील संकल्पना चित्र तयार करा.
👉
हे पण वाचा 👇👇👇👇👇
0 टिप्पण्या