कवी कुसुमाग्रज जन्मदिवस भाषण | Kavi kusumagraja janmadivas Bhashan

 मराठी राजभाषा दिन :-  कवी कुसुमाग्रजांची लेखन शैली व साहित्यातील योगदान 

        अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्र-मैत्रिणींनो आज 27 फेब्रुवारी म्हणजेच मराठी राजभाषा दिन.

 माझ्या मराठी मातीचा 

लावा ललाटास टिळा 

हिच्या संघाने जागल्या 

दऱ्या खोऱ्यातील शिरा 

असे मराठी भाषेची थोरवी गाणारे, मराठी भाषेचे अग्रगण्य कवी, ऋषितुल्य व्यक्तिमत्व आणि साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यिक कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. कवी कुसुमाग्रज यांची पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. त्यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 मध्ये पुण्यात झाला. त्यांनी 16 खंडांची कविता, 3 कादंबरी, लघुकथेचे 8 खंड, निबंधाचे 7 खंड, 18 नाटके व 6 एकांकिका यांचे लेखन केले आहे.

 1942 मध्ये त्यांच्या विशाखा या ग्रंथाने भारतीय स्वातंत्र्य चळवळीत तरुण पिढीला प्रेरित केले. हा ग्रंथ अमूल्य साहित्य ठेवा ठरला आहे. आजही भारतीय साहित्याचे उत्कृष्ट कार्य म्हणून या ग्रंथास ओळखले जाते. 

कुसुमाग्रजांच्या कविता तरुणांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. शेवटी त्यांची एक कविता आठवते जी युवकांना प्रेरणा देणारी आहे. ती म्हणजे

 मोडून पडला संसार पण, मोडला नाही कणा 

 पाठीवरती हात ठेवून, नुसतं लढ म्हणा 


जय हिंद

               जय भारत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या