राष्ट्रीय विज्ञान दिन सूत्रसंचालन
सुस्वागतम ...... सुस्वागतम ...... सुस्वागतम .....
🔹मी ...... आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करतो.
🔹आलेल्या सर्व मान्यवरांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे ही नम्र विनंती.
🔹 आज 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. डॉक्टर सी व्ही रामन यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
वैज्ञानिक संशोधकांच्या प्रयत्नांनी
भारताचे नाव अग्रेसर या जगात
अशा सर्व वैज्ञानिक संशोधकांस करुनी वंदन
करूया या कार्यक्रमास सुरुवात
🔹अध्यक्ष निवड :-
जीवन जगताना संगत असते मित्राची
सोडवण्या अवघड उदाहरणे मदत होते सूत्रांची
सुकर करण्या जीवन मदत होते विज्ञानाची
शोभा वाढवण्या कार्यक्रमाची मदत होते अध्यक्षांची
......... मदत होते अध्यक्षांची
आजाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान ..... यांनी स्वीकारावे ही विनंती.
🔹अनुमोदन :-
मी ..... यांच्यावतीने जाहीर करतो की त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले.
🔹प्रतिमापूजन/ दीपप्रज्वलन :-
विषमतेचा अंधार दूर सारण्या
मना मनात दीप पेटवुया
करुनी प्रतिमापूजन
तेज कार्यक्रमाचे वाढवुया
मी कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्वच मान्यवरांना आदर भावे विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पूजन करावे.
🔹 विद्यार्थी मनोगत :-
1) ..........
2) .........
3) ........
4) ........
🔹मान्यवर / शिक्षक मनोगत :-
1) .........
2) ........
3) ........
4) .......
🔹अध्यक्ष मनोगत :-
दुखाचे वादळ सुखाचे फळ
अंधार प्रकाशाने भरलेले जीवन
देण्या आपणा नवविचारांचे बळ
बोलावतो मी अध्यक्षांना करावे त्यांनी मार्गदर्शन
🔹आभार प्रदर्शन :-
मी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित सर्वच मान्यवर, श्रोते व आयोजकांचे आभार मानतो.
🔹समारोप :-
मी अध्यक्षांच्या मध्ये जाहीर करतो की कार्यक्रम येथे संपला.
~ Thank You ~
0 टिप्पण्या