जागतिक महिला दिन भाषण | Jagatik Mahila Din Bhashan

जागतिक महिला दिन भाषण 


पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींनो ...

ज्याला स्त्री 'आई' म्हणून कळली
                                    तो जिजाऊंचा 'शिवबा' झाला ...
ज्याला स्त्री 'बहीण' म्हणून कळली 
                                 तो मुक्ताईचा 'ज्ञानदेव' झाला ...
ज्याला स्त्री 'मैत्रीण' म्हणून कळली 
                          तो राधेचा 'शाम' झाला ...

              प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 
              महिलांनी देशाच्या प्रगतीसाठी अनेक क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. अनेक यशस्वी व्यक्तींच्या जीवनामध्ये स्त्रियांचा मोठा वाटा आहे.
               छत्रपती शिवाजी महाराजांना घडवून स्वातंत्र स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी केलेल्या संघर्षाचे दर्शन देणाऱ्या राजमाता जिजाऊ, मे मेरी झांसी कमी नही दुंगी असे ठणकावून इंग्रजांसोबत संघर्ष करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, मुलींच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले, कल्पना चावला, सिंधुताई सपकाळ यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणीचा सामना करत देशाच्या प्रगतीसाठी मोलाचे योगदान दिले. महिलांचे हक्क, शिक्षण याबद्दल जागृकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. स्त्री कुटुंबात प्रत्येक व्यक्तीची काळजी घेत असते. देशाच्या प्रगतीमध्ये स्त्रियांचे योगदान फार मोलाचे आहे. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांची कामगिरी उल्लेखनीय आहे.

शेवटी एवढेच म्हणावेसे  वाटते 

स्त्री म्हणजे वास्तव्य, स्त्री म्हणजे मांगल्य ...

थ्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तुत्व ...

 जय हिंद
      जय भारत


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या