जागतिक महिला दिन सूत्रसंचालन
आगतम ........ स्वागतम ....... सुस्वागतम .........
🔹मी ....... आलेल्या सर्वच मान्यवरांचे सहर्ष स्वागत करतो.
🔹आलेल्या सर्वच मान्यवरांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे ही नम्र विनंती.
🔹महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
स्त्री म्हणजे वास्तव्य, स्त्री म्हणजे मांगल्य ...
थ्री म्हणजे मातृत्व, स्त्री म्हणजे कर्तुत्व ..
🔹अध्यक्ष निवड :-
कार्य हीच आमची ओळख
विद्यार्थी हेच आमचे दैवत
शिक्षण हाच आमचा वसा
अशी आमच्या शाळेची एक आगळीवेगळी आणि खास ओळख निर्माण करणारे आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री / सौ ........... यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान स्वीकारावे ही नम्र विनंती.
🔹अनुमोदन :-
मी ........... वतीने जाहीर करतो की त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले.
🔹दीप प्रज्वलन / प्रतिमापूजन :-
सुमंगल वातावरणात
समईच्या उजळल्या वाती
मान्यवरांच्या शुभहस्ते
प्रज्वलित कराव्या ज्ञानज्योती
~ गिरीश दारुंटे
मी कार्यक्रमाचे अध्यक्ष व सर्वच मान्यवरांना आदर भावे विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन / प्रतिमापूजन करावे.
🔹मान्यवर परिचय व स्वागत :-
(व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा त्यांच्या कर्तुत्वानुसार परिचय करून देण्यात यावा)
🔹प्रास्ताविक :-
आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे श्री / सौ .......... करतील.
🔹विद्यार्थी व शिक्षक मनोगत :-
1) .........
2) ..........
3) ..........
🔹अध्यक्ष मान्यवर मनोगत :-
मी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री / सौ ....... यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे.
🔹 आभार प्रदर्शन / समारोप :-
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व मान्यवरांनी वेळात वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन केले तसेच आमच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे मी आभार मानतो.
कार्यक्रम येथे संपला असे अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतात.
0 टिप्पण्या