माझा आवडता प्राणी गाय निबंध | Gay nibandh

 माझा आवडता प्राणी गाय निबंध


नमस्कार मित्रांनो....

                आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत आपल्या आवडत्या प्राण्याबद्दल निबंध. सर्वांनाच कोणतातरी एखादा प्राणी खूप आवडतो. त्यात कोणाला मांजर आवडते, कुत्रा, बैल, गाय, म्हैस, सिंह, असे अनेक प्रकारचे प्राणी आहेत. पण मला मात्र गाय हा प्राणी खूप आवडतो, म्हणूनच आपण आज  माझा आवडता प्राणी गाय निबंध मराठीमध्ये बघणार आहोत. 

        गाय हा पाळीव प्राणी आहे. भारतीय गायीचे शास्त्रीय नाव बॉस इंडिकस असून यात डांगी, गीर, खिल्लार अशा उपजातींचा समावेश होतो. गाय ही रंगाने पांढरी, काळी आणि करड्या रंगाची असते. गायीला दोन शिंगे असतात ती शिंग टोकदार उंच आणि आकाराने वक्र असतात.  तसेच तिला चार पाय, दोन कान, एक नाक , एक तोंड आणि एक शेपूट असते. गाय गवत खाते तसेच शेतात पिकवल्या गेलेल्या पिकांचा ओला तसेच सुकलेला पाला पाचोळा जसे वैरण, कडबा अशा प्रकारचे अन्न सुद्धा गाय खाते. गायीच्या पिल्लाला वासरू म्हणतात. गायीच्या ओरडण्याचा हांबरणे म्हणतात. 

हे पण वाचा 👇


        ग्रामीण भागात प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी एक तरी गाय असते जी त्याला उपयोगी पडत असते.  ती शेतकऱ्याला शरीराच्या वाढीसाठी पोषक दूध देते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी गायीचे दूध चांगले असते. गायीच्या दुधापासून दही, ताक , लोणी, पनीर, श्रीखंड असे अनेक पदार्थ बनविले जातात. गायीच्या शेणापासून शेतीस उपयुक्त असे शेणखत बनविले जाते. तसेच शेणाच्या गोवऱ्या बनवून त्यांचा जाळण्यासाठी उपयोग होत असतो आणि शेणाने सावरलेल्या घरात कीटक कमी येतात. गायीच्या गोमूत्र हे अनेक आजारांवर प्रभावी उपचारासाठी उपयुक्त आहे.  


हे पण वाचा 👇

            मित्रांनो तुम्हाला माझा आवडता प्राणी गाय हा निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्हाला या व्यतिरिक्त काही इतर विषयांवर निबंध हवे असतील तर तेही सांगा आम्ही नक्की प्रयत्न करून ती माहिती तुमच्यापर्यंत पोहचवू. अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या इतर ब्लॉग पोस्ट बघू शकतात. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या