स्वाध्याय । पाठ २३. संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Sansargjanya Rog Ani Rogapratibandh Swadhyay 5vi

 स्वाध्याय । पाठ २३. संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध 


१. काय करावे बरे ?

(अ) खूप भूक लागली आहे ; परंतु अन्नपदार्थ उघड्यावर ठेवले आहेत.

👉 खूप भूक लागली असेल ; परंतु अन्नपदार्थ उघड्यावर ठेवले असतील तर ते खाऊ नये. कारण की त्यावर धूळ , माश्या व तसेच इतर प्रकारचा सूक्ष्म कचरा बसलेला असतो. उघड्यावर ठेवलेल्या अन्नात रोगजंतू असण्याचे प्रमाण अधिक असते आणि ते अन्न खाल्यामुळे आपल्याला त्याचा वाईट परिणामही होऊ शकतो. म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ खाऊ नयेत.


२. जरा डोके चालवा.

डासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करणे, पाणी साचू न देणे यांपैकी अधिक चांगला उपाय कोणता ? का ?

👉 डासांची पैदास रोखण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी पाण्यावर केली तर कीटकनाशकांमध्ये असणारे घातक द्रव्य पाण्यात मिसळून ते पाणी जवळच्या शुद्ध पाण्याच्या स्त्रोतात मिसळल्याने पाण्याचे प्रदूषण होईल. 


३. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) संसर्गजन्य रोग म्हणजे काय ?

👉 एका रोगाची लागण दुसऱ्याला होऊ शकते अशा रोगांना संसर्गजन्य रोग असे म्हणतात.

(आ) रोगप्रसाराची माध्यमे कोणती आहेत ?

👉 हवा, पाणी, अन्नघटक, कीटक इत्यादी रोगप्रसाराची माध्यमे आहेत.

 (इ) रोगाची साथ येते तेव्हा काय होते ?

👉 रोगाची साथ येते तेव्हा एका ठिकानाच्या अनेक लोकांना 

(ई) लसीकरण म्हणजे काय ?

👉 एखाद्या रोगा विरुद्ध लढा देण्यासाठी शरीरामध्ये त्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी शरीरात प्रतिकारशक्ती तयार व्हावी यासाठी इंजेक्शनद्वारे किंवा तोंडावाटे जी लास दिली जाते त्यास लसीकरण असे म्हणतात.

( उ ) नवजात बालकाला देण्यात येणाऱ्या लसींची यादी करा.

👉 1. पोलिओ

2. रोटाव्हायरस लस

3. एफआयपीव्ही


४. पुढील विधाने बरोबर की चूक ते लिहा.

(अ) आतड्याच्या रोगांचा प्रसार हवेतून होतो. 

👉 चूक.

(आ) काही रोग दैवी प्रकोपामुळे होतात.

👉 चूक.


५. पुढे काही रोग दिले आहेत. त्यांचे अन्नातून प्रसार, पाण्यातून प्रसार आणि हवेतून प्रसार असे वर्गीकरण करा.

मलेरिया, टायफॉइड, कॉलरा, क्षय, कावीळ, गॅस्ट्रो, हगवण, घटसर्प .

👉 1) हवेतून प्रसार :- क्षय आणि घटसर्प

2) पाण्यातून प्रसार :- टायफॉइड, कॉलरा, कावीळ, गॅस्ट्रो, हगवण

3) हवेतून प्रसार :- टायफॉइड, कॉलरा, कावीळ, हगवण


६. कारणे दया.

(अ) गावात कॉलराची साथ पसरली असता पाणी उकळून प्यावे.

👉 कॉलरा या रोगाचा प्रसार दूषित पाण्यामुळे होतो. कॉलरा रोगाचे रोगजंतू पाण्याच्या स्त्रोतात मिसळल्याने या रोगाचा प्रसार सर्वत्र होतो. पाणी उकळून पिल्याने पण्यातील कॉलरा  रोगाचे रोगजंतू नष्ट होतात. म्हणून गावात कॉलराची साथ पसरली असता पाणी उकळून प्यावे.

(आ) परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नयेत.

👉 परिसरात पाण्याची डबकी असल्यामुळे त्या पाण्यात डासांची पैदास होते. डासांची पैदास रोखली की हिवताप आणि डेंग्यू यांसारख्या आजारांवर नियंत्रण मिळविता येते. म्हणून परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नयेत.


हे पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय । पाठ २२. वाढ आणि व्यक्तिमत्व विकास । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Swadhyay Vadh Ani Vyaktimatv Vikas 5vi 

स्वाध्याय ।  पाठ २४. पदार्थ, वस्तू आणि ऊर्जा  । इयत्ता :- ५ वी ।  विषय :- परिसर अभ्यास भाग १ |  Swadhyay Padarth Vastu Ani Urja 5vi 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या