स्वाध्याय । पाठ २४. पदार्थ, वस्तू आणि ऊर्जा । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Padarth Vastu Ani Urja Swadhyay 5vi

 स्वाध्याय । पाठ २४. पदार्थ, वस्तू आणि ऊर्जा


१. काय करावे बरे ? 

(अ) पाहुण्यांसाठी पटकन सरबत करायचे आहे. घरात केवळ खडीसाखर आहे.

👉 सरबत बनवताना खडीसाखर लवकर विरघळणार नाही म्हणून खडीसाखर कुटली असता तिची पूड होईल, म्हणजेच बारीक कण होतील आणि हे कण पाण्यात लगेच विरघळतील व पाहुण्यांसाठी पटकन सरबत करता येईल.

(आ) मक्याच्या कणसावर लावायला मीठ हवे आहे पण फक्त खडेमीठ उपलब्ध आहे.

👉 उपलब्ध असलेल्या खडेमिठाला कुटल्यवर त्याची बारीक पावडर तयार होईल व ती पावडर मक्याच्या कणसावर लावायला मदत होईल.


२. जरा डोके चालवा.

(अ) कापराच्या वड्यांचा आकार हळूहळू कमी होताना का दिसतो.

👉 कापराच्या वड्यांचे सतत वायू रूपातील लहान लहान कणात रूपांतर होत असते. म्हणून कापराच्या वड्यांचा आकार हळूहळू कमी होत जातो.

(आ) सार्वजनिक वाहनांचा उपयोग केल्याने इंधनाची बचत कशी होते ?

👉 मोटार गाडीत पेट्रोल किंवा डिझेलच्या ज्वलनातून वाहन चालण्यासाठी ऊर्जा निर्माण होते. प्रत्येक वाहन चालण्यासाठी इंधनाची गरज असते. एकाच वेळी जर प्रत्येकाने वेगवेगळ्या मोटारगाड्या वापरल्या तर तितक्या जास्त प्रमाणात इंधन संपते. आणि जर या सर्वांनी एकाच सार्वजनिक वाहनातून प्रवास केल्यास इंधन एकाच मोटार गाडीचे लागेल. व इतर वाहनांसाठी खर्च होणाऱ्या इंधनाची बचत होईल.


३. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) डांबरगोळ्या ठेवलेल्या कपड्याला डांबर- गोळ्यांचा वास कशामुळे येतो ?

👉 डांबर गोळ्यांचे सतत वायू रूपातील लहान लहान कणात रूपांतर होत राहते. हे कण कपड्यावर बसल्यामुळे डांबरगोळ्या ठेवलेल्या कपड्याला डांबर- गोळ्यांचा वास  येतो.

(आ) निसर्गात पाणी कोणकोणत्या अवस्थांमध्ये आढळते ?

👉 निसर्गात पाणी स्थायू , द्रव आणि वायू या तीन अवस्थांमध्ये आढळते.

(इ) पदार्थांची स्थायू, द्रव, वायू ही अवस्था कशावरून ठरते?

👉 पदार्थांची स्थायू, द्रव, वायू ही अवस्था त्याच्यातील कणांच्या मांडणीवरून ठरते.

(ई) ऊर्जा कशाला म्हणतात ?

👉 कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात.


हे पण वाचा 👇👇👇👇👇



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या