स्वाध्याय । पाठ २५. सामाजिक आरोग्य
१. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
(अ) निरामयतेमुळे आपल्यातील ......... भावना वाढते.
👉 निरामयतेमुळे आपल्यातील मित्रत्वाची भावना वाढते.
(आ) तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने .......... मध्येही कर्करोग होऊ शकतो.
👉 तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने अन्ननलिकेमध्येही कर्करोग होऊ शकतो.
(इ) अति .......... मुळे यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात.
👉 अति मद्यपाना मुळे यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात.
(ई) देशाची प्रगती आणि विकास यांतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ..............
👉 देशाची प्रगती आणि विकास यांतील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे देशातील लोक.
(उ) व्यक्तिगत आरोग्य व सवयीतून आपल्याला समाजाचे ........... व सार्वजनिक ............ प्राप्त करता येते.
👉 व्यक्तिगत आरोग्य व सवयीतून आपल्याला समाजाचे आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता प्राप्त करता येते.
२. खालील वाक्य चूक की बरोबर ते सांगा. चुकीचे विधान दुरुस्त करून लिहा.
(अ) प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटक दंशापासून होणारे आजार, सामाजिक आरोग्य चांगले बनवतात.
👉 चूक.
दुरुस्त विधान :- प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटक दंशापासून होणारे आजार, सामाजिक आरोग्य धोक्यामध्ये आणते.
(आ) सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास कायद्याने मनाई केली आहे.
👉 बरोबर.
(इ) पोषक आहार, वैद्यकीय स्वच्छता, व्यायाम आणि छंदाची जोपासना यांतून उत्तम आरोग्य मिळते.
👉 बरोबर.
(ई) आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन जगता येत नाही.
👉 चूक.
दुरुस्त विधान :- आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन जगता येते.
३. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) उत्तम आरोग्य कसे मिळवता येते.
👉 पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता, अभियान आणि छंदाची जोपासना यातून उत्तम आरोग्य मिळवता येते.
(आ) सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक कोणते ?
👉 दूषित पाणी, कुपोषण, प्रदूषण, अज्ञान व अंधश्रद्धा, व्यसनाधीनता इत्यादी सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक आहेत.
(इ) तंबाखू खाण्याचे घातक परिणाम कोणते ?
👉 तंबाखू खाल्याने पुढील घातक परिणाम होतात.
1. तोंडामध्ये हळूहळू व्रण पडतात.
2. व्रणांच्या मोठमोठ्या जखमा होतात. काही दिवसांनी गाठी होतात.
3. तंबाखू पोटात गेल्यावर पोटाच्या निरनिराळ्या तक्रारी सुरू होतात. तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने अन्ननलिकेचा कर्करोग होऊ शकतो.
4. कर्करोग झालेल्या व्यक्तीला औषधोपचाराचाही त्रास होत राहतो.
5. कधी कधी मृत्यू देखील ओढवतो.
6. तोंडाचा कर्करोग होतो.
(ई) मद्यपानाचे घातक परिणाम कोणते ?
👉 मद्यपानाचे घातक परिणाम पुढीलप्रमाणे आहेत.
1. मद्यपानामुळे गुंगी येते व मेंदूवरील नियंत्रण सुटते.
2. अति मद्यपानामुळे यकृताचे, आतड्याचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात.
3. कुटुंबे उद्ध्वस्त होतात.
हे पण वाचा 👇👇👇👇👇
0 टिप्पण्या