स्वाध्याय । पाठ २२. वाढ आणि व्यक्तिमत्व विकास । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Vadh Ani Vyaktimatv Vikas Swadhyay 5vi

 स्वाध्याय । पाठ २२. वाढ आणि व्यक्तिमत्व विकास


१. काय करावे बरे ?

कबीरला प्राणिशास्त्र विषयाचा प्राध्यापक व्हायचे आहे. त्यासाठी त्याने आत्तापासून काय तयारी करावी ?

👉 कबीरला प्राणीशास्त्र विषयाचा प्राध्यापक व्यायचे असेल तर त्याला रोजचे येणारे मासिके पुस्तके यांत असणारी प्राणीशास्त्र संदर्भातील माहिती वाचावी. प्राणी निरीक्षण आणि पक्षी निरीक्षण करण्यासाठी कबीरने पुरेपूर वेळ दिला पाहिजे. 


२. जरा डोके चालवा.

(अ) सायकल चालवायला शिकण्यापूर्वी आपल्यात इतर कोणकोणती कौशल्ये विकसित झालेली असतात ?

👉 सायकल चालवण्यासाठी स्वतःच्या नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. सायकल चालवायला शिकण्यापूर्वी डोळे सावधान असणे गरजेचे आहे. सतत सतर्क राहणे आवश्यक आहे. 

(आ) सुमनला पुढे स्वतःचे हॉटेल चालवायचे आहे. तिच्या पुढील जीवनातील कामात ती आता शिकत असलेली कोणती कौशल्ये तिला उपयोगी पडणार आहेत ?

👉 1. स्वयंपाक बनवता येणे. 

2. सर्वांशी नम्र राहणे.

3. सगळ्यांबरोबर काम करणे.

4. भाषण आणि संवाद साधण्याचे कौशल्य.

5. जिद्द आणि कामाबद्दल असलेली चिकाटी.


३. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा.

(अ) आनुवंशिकता म्हणजे काय ?

👉 आपल्या कुटुंबीयांसरखी आपल्यामध्ये जन्मतःच अनेक लक्षणे येणे, याला ' आनुवंशिकता ' म्हणतात.

(आ) बालवर्गातील मुले व पाचवीचा विदयार्थी यांच्यात दिसणारे फरक सांगा.

👉 बालवर्गातील मुले :-

1. बालवर्गातील मुले हे 3 ते 5 वर्ष वयोगटातील असतात.

2.  उंची व शारीरिक ताकद कमी असते.

3. दुसऱ्यांच्या मदतीशिवाय ते शाळेत जाऊ शकत नाही.

पाचविचा विद्यार्थी :-

1. ही मुले 9 ते 11 वयोगटातील असतात.

2. उंची व शारीरिक ताकद बालवर्गातील मुलांपेक्षा चांगली असते.

3. कौशल्य काही प्रमाणात जास्त असतात.

4. ही मुले शाळेत एकटी जाऊ शकतात.

(इ) जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंत आपल्यात कोणकोणते बदल होतात ? 

👉 1. आपली उंची व वजन वाढते.

2. आपण नवनवीन कौशल्य शिकत किंवा आत्मसात करत असतो.

3. लहानपणी आपली सर्व कामे इतरांवर अवलंबून असतात तर आपण मोठे झाल्यावर स्वतःची कामे आपण स्वतः करू शकतो.

(ई) तुम्ही आत्मसात केलेली कोणतीही तीन कौशल्ये लिहा.

👉 मी आत्मसात केलेली कौशल्ये पुढील प्रमाणे

1. धावणे 

2. पोहणे

3. न अडखळता वाचन

( उ ) शारीरिक वाढ कशाला म्हणतात ?

👉 आपली उंची आणि वजन वाढते. यासोबतच आपले जस जसे वय वाढत जाते तशी आपली शारीरिक ताकदही वाढते. यालाच शारीरिक वाढ असे म्हणतात.


४. चूक की बरोबर ते सांगा.

(अ) नव्याने शिकलेली कामे बाळ हळूहळू न चुकता करू लागते.

👉 बरोबर.

(आ) जन्मतःच आपण कौशल्ये आत्मसात केलेली असतात.

👉 चूक.

(इ) स्वतःची सर्वच कामे आपण स्वतः करत नाही.

👉 बरोबर.

(ई) जन्मापासून वृद्धावस्थेपर्यंत आपली उंची वाढत राहते.

👉 चूक. 


हे पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय । पाठ २१. कामांत व्यस्त आपली आंतरेंद्रिये । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Swadhyay Kamant Vyast Apali Antarendriye 5vi 

स्वाध्याय । पाठ २३. संसर्गजन्य रोग आणि रोगप्रतिबंध । इयत्ता :- ५ वी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Swadhyay Sansargjanya Rog Ani Rogapratibandh 5vi 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या