स्वाध्याय । पाठ १८. कुटुंब आणि शेजरात होत असलेले बदल । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Kutumb Aani Shejarat Hot Asalele Badal Swadhyay 4 thi

 कुटुंब आणि शेजरात होत असलेले बदल स्वाध्याय 

 कुटुंब आणि शेजरात होत असलेले बदल स्वाध्याय| Kutumb Aani Shejarat Hot Asalele Badal Swadhyay 


(अ) रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

१. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला .......... म्हणतात.

👉 एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला स्थलांतर म्हणतात.

२. स्थलांतरामुळे आपल्याला आपल्या देशातील .......... दर्शन होते.

👉 स्थलांतरामुळे आपल्याला आपल्या देशातील विविधतेचे दर्शन होते.


(आ) एका वाक्यात उत्तरे लिहा.

१. शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरेनासे का झाले ?

👉 कुटुंबातील माणसांची संख्या वाढल्यामुळे शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरेनासे झाले. 

२. माणूस स्थलांतर का करतो ?

👉 शिक्षणामुळे, व्यवसायामुळे व नोकरीमुळे माणूस स्थलांतर करतो.



(इ) करणे द्या.

१. मोठी कुटुंबे विखुरली गेली.

👉 मोठी कुटुंबे विखुरली गेली कारण,

1. कुटुंबातील माणसांची संख्या वाढल्यामुळे शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरेनासे झाले. 

2. व्यापार आणि नवनवीन उद्योगधंदे यांचा विकास होऊन शहरे वाढू लागली.

3. नोकरी तसेच व्यवसायासाठी माणूस शहरामध्ये जाऊ लागला.

२. शेजाऱ्यांनबरोबरचे संबंध सखोल्याचे होतात.

👉 कुटुंबांव्यतिरिक्त आपला रोजचा संबंध आपल्या शेजाऱ्यांबरोबर येत असतो. परिसरातील कचरा, सुरक्षितता, पाणी, वीज यांसारखे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एकमेकांची मदत हवी असते. वेळ प्रसंगी आपले नातेवाईक आपल्या मदतीला येईपर्यंत शेजारीच मदतीला येतात. अशा प्रकारे शेजाऱ्यांबरोबरचे संबंध सखोल्याचे होतात.


हे पण वाचा 👇👇👇👇👇

स्वाध्याय । पाठ १७. माझी जडणघडण । इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Mazi Jadanghadan Swadhyay 4 thi 

स्वाध्याय । पाठ १९. माझी आनंददायी शाळा। इयत्ता :- ४ थी । विषय :- परिसर अभ्यास भाग १ | Mazi Aanandadayi Shala Swadhyay 4 thi 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या