3 हडप्पा संस्कृती स्वाध्याय 6 वी इतिहास Hadappa Sanskruti Swadhyay 6 vi Itihas

हडप्पा संस्कृती स्वाध्याय

हडप्पा संस्कृती स्वाध्याय | Hadappa Sanskruti Swadhyay 

1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

(1) या संस्कृतीला हडप्पा हे नाव का मिळाले असावे ?

👉 इ. स. 1921  मध्ये प्रथम हडप्पा येथे  हे उत्खनन होऊन एका प्राचीन संस्कृतीचा शोध लागल्याने या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले असावे.

(2) हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये कोणत्या प्रतिकांचा समावेश आहे ?

👉 हडप्पा संस्कृतीतील भांड्यांचा नक्षींच्या नमुन्यांमध्ये माशांची खवले, एकमेकांत गुंतलेली वर्तुळे, पिंपळपान यांसारख्या प्रतीकांचा समावेश आहे.

(3) हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत ?

👉 हडप्पा संसकृतीतील व्यापारी मलमलचे कापड इजिप्तला पुरवत असत.


2. प्राचीन स्थळांना भेटी देताना काय कराल ?

जसे - तळा विषयी माहिती मिळवा प्रदूषण रोखणे ऐतिहासिक साधनांची जपण करणे इत्यादींबाबत.

👉 प्राचीन स्थळांना भेटी देताना आम्ही तेथील स्थळांविषयी संपूर्ण माहिती घेऊ. त्या स्थळाचा इतिहास जाणून घेऊ. तेथील भौगोलिक परिस्थितीची माहिती घेऊ. त्या स्थळाचे व्यवस्थित जतन होत आहे की नाही ते पाहू. तिथे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत असले तर स्थानिक संस्थेसोबत त्याविषयी चर्चा करू. तसेच ठीक ठिकाणी सूचनांचे फलक लावू.


4. हडप्पाकालीन लोकजीवनाची माहिती खाली दिलेल्या तक्त्यात लिहा.

👉 




5. एका शब्दात उत्तरे द्या. असे प्रश्न तुम्ही स्वतः तयार करा व त्यांची उत्तरे लिहा.

👉

i) हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीच्या शवाबरोबर पुरत असलेली वस्तू कोणती ?

उत्तर - मातीची भांडी.

ii) महास्नानगृहातील स्नान कुंडाची लांबी किती ?

उत्तर - 11 मीटर.

iii) हडप्पा संस्कृतीत प्रचंड आकाराची गोदी सापडलेले ठिकाण कोणते ?

उत्तर - लोथल 


हे पण वाचा 👇

2. इतिहासाची साधने स्वाध्याय 6वी इतिहास

4 वैदिक संस्कृती स्वाध्याय




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या