लालबहादूर शास्त्री जयंती | महात्मा गांधी जयंती
विषय - लालबहादूर शास्त्री यांचे अनमोल योगदान
अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजनवर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मित्र मैत्रिणींना ...
लालबहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक, महान नेते, तसेच भारताचे दुसरे पंतप्रधान होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेश मधील मुगलसराई गावी झाला.
लालबहादूर शास्त्री लहानपणापासूनच समंजस, आणि नैतिक मूल्य जपणारे होते. शिक्षण चालू असताना गांधीजींच्या भाषणाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की त्यांनी शिक्षण सोडून देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शास्त्रीजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत कार्य करू लागले.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांना इसवी सन 1956 साली भारताचे रेल्वेमंत्रीपद मिळाले. त्यानंतर 9 जून 1964 साली ते भारताचे पंतप्रधान झाले. तसेच 9 जून 1964 ते 17 जुलै 1964 या काळात ते भारताचे परराष्ट्र मंत्री सुद्धा होते. शैक्षणिक व सामाजिक सुधारणा हे त्यांचे ध्येय होते. त्यांनी 30 हून अधिक वर्ष देशसेवा केली.
शास्त्रीजींच्या मते स्वातंत्र्य रक्षणाची जबाबदारी फक्त सैनिकांची नसून देश रक्षण करण्यासाठी संपूर्ण देश बळकट असायला हवा. त्यांनी आपल्या देशाला विकासाच्या मार्गावर नेले. स्वातंत्र्याचे रक्षण व लोकांचे पोषण यांचे अजोड रहस्य पटविण्यासाठी शास्त्रीजींनी देशाला 'जय जवान जय किसान' हा मंत्र दिला. अशा थोर पुरुषाचा 10 जानेवारी 1966 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे जीवन ज्योत मावळली.
त्यांनी देशासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते ...
तुमको नमन भारत के अनमोल लाल
तुम्हे पाकर भारतभूमी हुई निहाल
जय जवान जय किसान
हे पण वाचा 👇
0 टिप्पण्या