4 वैदिक संस्कृती स्वाध्याय
वैदिक संस्कृती स्वाध्याय Vaidik Sanskruti Swadhya |
1. पाठातील आशयाचा विचार करून उत्तरे लिहा.
(1) वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया.
👉 लोपमुद्रा, गार्गी, मैत्रेयी.
(2) वेदकालीन मनोरंजनाची साधने.
👉 गायन, वादन, नृत्य, रथांच्या शर्यती आणि शिकार.
(3) वेदकालीन चार आश्रम.
👉 ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, सन्यासाश्रम .
2. चूक की बरोबर ओळखा.
(1) यज्ञात म्हटले जाणारे मंत्र - ऋग्वेद
👉 चूक.
(2) अथर्व ऋषींचे नाव दिलेलं वेद - अथर्ववेद
👉 बरोबर.
(3) यज्ञविधींच्या वेळी मंत्रगायन करण्यास मार्गदर्शन करणारा वेद - सामवेद
👉 बरोबर.
3. एका शब्दात उत्तरे लिहा.
(1) वैदिक वाङमयाची भाषा संस्कृत.
(2) विद् म्हणजे जाणणे.
(3) गोधूम म्हणजे गहू.
(4) घराचा प्रमुख म्हणजे गृहापती.
(5) श्रेणीच्या प्रमुखाला म्हणत श्रेष्ठी.
4. नावे लिहा.
(1) तुम्हास माहीत असलेली वाद्य
👉 तबला, बासरी, मृदंग , विना.
(2) सध्याच्या काळातील स्त्रियांचे किमान दोन दागिने
👉 नथ, नेकलेस,
(3) सध्याची मनोरंजनाची साधने
👉 टीव्ही, मोबाईल
5. थोडक्यात उत्तरे लिहा.
(1) वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होता ?
👉 i) वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा समावेश होता.
ii) तसेच उडीद, मसूर, तीळ आणि मांस हे पदार्थही त्यांच्या आहारात असत.
iii) दूध, दही, तूप, लोणी, मध हे त्यांचे आवडते पदार्थ होते.
(2) वेदकाळात गाईची विशेष काळजी का घेतली जाई ?
👉 i) वेदकालीन लोकांना गाईचे दूध व दुधापासून तयार केलेले पदार्थ आवडत असत.
ii) त्या काळात गाईचा विनिमयासाठी उपयोग केला जाई त्यामुळे गाईंना विशेष महत्त्व होते.
iii) अशा किमती आणि उपयुक्त गाई कोणी चोरून नेऊ नयेत. म्हणून वेदकाळात गाईंची विशेष काळजी घेतली जाई.
(3) सन्यासाश्रमात मनुष्याने कसे वागावे अशी अपेक्षा होती ?
👉 i) सन्यासाश्रमात मनुष्याने सर्व नात्यांचा त्याग करावा.
ii) मनुष्यजन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे.
iii) फार काळ एके ठिकाणी राहू नये, अशा पद्धतीने मनुष्याने वागावे अशी अपेक्षा होती.
6. टीपा लिहा.
(1) वेदकालीन धर्मकल्पना
👉 i) वेदकालीन धर्मकल्पनांमध्ये निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवतारूप दिलेले होते.
ii) त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत.
iii) त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत. त्याला ‘हवी’ असे म्हणत. अशा तऱ्हेने अग्नीमध्ये ‘हवी’ अर्पण करण्याची विधी म्हणजे यज्ञ.
iv) प्राणी मात्रांचे जीवन हाही सृष्टीचक्राचाच भाग आहे. सृष्टीचक्रात बिघाड झाल्यावर अनेक संकटे येतात. तसे होऊ नये म्हणून प्रत्येक मनुष्याने काळजी घ्यायला हवी. सर्वांनी सृष्टीचे नियम न मोडता वागणे म्हणजे धर्माप्रमाणे वागणे समजले जाई.
(2) वेदकालीन घरे
👉 i) वेदकाळातील घरे ही मातीची किंवा कुडापासून तयार केलेली असत.
ii) गवत किंवा वेलींचे जाड तट्टे विणून त्यावर शेण-माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कुड होय.
iii) या घरांच्या जमिनी शेणा मातीने सारवलेल्या असत. घरासाठी ‘गृह’ किंवा ‘शाला’ हे शब्द वापरले जात.
(3) वेदकालीन शासनव्यवस्था
👉 i) वेदकाळातील ग्रामवसाहतीच्या प्रमुखास ‘ग्रामणी’ असे म्हटले जाई.
ii) ग्रामवसाहतींचा समूहाला ‘विश्’असे म्हटले जात असे. आणि त्या समूहाच्या प्रमुखास ‘विश्पति’ असे म्हणत.
iii) अनेक ‘विश्’ मिळून ‘जन’ तयार होत असे आणि हे जन नंतर जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले, तेव्हा त्या प्रदेशाला ‘जनपद’ म्हटले गेले. ‘जन’च्या प्रमुखाला ‘नृप’ किंवा ‘राजा’ म्हटले जाई.
iv) ‘जन’ च्या उत्पन्नातील राजाचा ‘भाग’ गोळा करणारा भागदुघ असे.
v) राजाला मार्गदर्शन करण्यासाठी ‘सभा’, ‘समिती’, ‘विदथ’ आणि ‘जन’अशा प्रकारच्या चार संस्था होत्या. त्यांमध्ये राज्यातील लोक सहभागी होत.
vi) ‘सभा’ आणि ‘विदथ’ या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग असे. राज्यातील ज्येष्ठ व्यक्तींच्या मंडळास ‘सभा’ म्हटले जात असे.
vii) तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस ‘समिती’ असे म्हणत.समितीमध्ये लोकांचा सहभाग असलेला पाहायला मिळतो.
हे पण वाचा 👇
5 प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह स्वाध्याय 6 वी इतिहास
0 टिप्पण्या