चित्ता प्राणी माहिती
चित्ता प्रामुख्याने गवताळ प्रदेशात आढळतो. चित्याच्या अंगावर भरीव ठिपके असतात व चेहऱ्यावरील अश्रूंसारख्या दिसणाऱ्या रेषा हे त्याचे वैशिष्ट्य आहे. चित्ता ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे अंगावरचे ठिपके. चीत्याची शेपटी साधारणपणे 84 cm पर्यंत असते. लांब शेपटीचा उपयोग चित्त्याला दिशा बदलण्यासाठी होतो. शेपटीच्या टोकाला सुरेख असा पुंजका असतो.
चिता हा मांसभक्षक असून त्याच्या आहारात छोटा हरणांचा समावेश होतो. आफ्रिकेत मुख्यत्वे इंपाला, विविध प्रकारचे गॅजेल, स्प्रिंगबक हे त्याचे खाद्य आहे. तो कधीकधी झेब्रा किंवा वाईल्ड बीस्ट अशा मोठ्या प्राण्यांचीही शिकार करण्यात यश मिळवतो. चित्त्याचे अतिशय वेगवान होण्याची कारण त्याचे खाद्य आहे.
भारतातील चित्त्याला आशियाई चिंता म्हणतात. भारतात शेवटचा चित्ता 1951 मध्ये आंध्र प्रदेशात दिसला होता. त्यानंतर भारतातून जंगली चित्ता दिसल्याची नोंद नाही. त्यामुळे भारतात चित्ता नामशेष झाला आहे.
तसेच आफ्रिकेतील मुख्यत्वे सव्हणाच्या गवताळ प्रदेशात अजूनही चित्त्याचे अस्तित्व आहे. तेथे खाद्याची मुबलकता आहे. अशा भागात अजूनही चित्त्या आढळतात. केनिया, झिंबाब्वे, बोटवाना, दक्षिण आफ्रिका, नामिबिया , युगांडा इत्यादी देशात चित्ता आढळतो.
हे पण वाचा 👇
0 टिप्पण्या