9 दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये स्वाध्याय 6 वी इतिहास | dakshin bhartatil prachin rajye swadhyay 6vi itihas

9 दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये स्वाध्याय 

दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये स्वाध्याय |dakshin bhartatil prachin rajye swadhyay

1. ओळखा पाहू.

1) सातवाहन राजे त्यांच्या नावाधिक कोणाचे नाव लावत - त्यांच्या आईचे.

2) कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव - कुंतल.


2. पठातील नकाशाचे निरीक्षण करून खालील तक्ता पूर्ण करा. 

👉



3. खालील राजसत्ता व राजधानी यांचे वर्गीकरण करा.

सातवाहन, पांड्य, चालुक्य, वाकाटक, पल्लव, मदुराई, प्रतिष्ठान, कांचीपुरम,, वातपी

👉 

राजसत्ता व राजधानी


4. पाठातील कोणत्याही तीन चित्रांचे निरीक्षण करून तुम्हाला काय माहिती मिळते ते त्या लिहा.

👉

वेरूळ येथील कैलास लेणे | Verul kailas lene

वेरूळ येथील कैलास लेणे - वेरूळ येथील कैलास लेणे हे एक रथमंदिराचे एक उदाहरण आहे. या मंदिराची रचना कलात्मक रित्या केलेली आपल्याला पाहायला मिळते. हे लेणे पूर्णपणे दगडात कोरले गेले आहे. या मंदिराच्या खांबांवर तसेच भिंतींवर सुंदर नक्षीकाम केलेले आपल्याला दिसून येते. या मंदिराच्या भिंतीवर उत्कृष्ट मुर्त्या कोरल्या गेल्या आहेत. या रथमंदिराच्या भिंतींवर अनेक प्रसंग शिल्पे कोरण्यात आली आहेत.

महाबलिपुरम येथील रथमंदिरे - ही मंदिरे अखंड पाषाणात खोदलेली आहेत. हे ठिकाण पल्लव वंशाच्या आधीपासून बंदर म्हणून प्रसिद्ध होते. इ.स. पहिल्या व दुसऱ्या शतकातील ग्रीक व रोमन ग्रंथात याचा मलंगी म्हणून उल्लेख आढळतो. तमिळ काव्यातही या बंदराचा उल्लेख आहे. प्राचीन काळी त्याला मलंगे व कदलमललई ही नावे होती.

अजिंठा येथील लेणे - औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा लेणी कोरलेली आहेत. या लेण्याच्या भिंती या चित्रांनी सुशोभित करण्यात आल्या आहेत. लेण्याच्या भिंतींवर वविध प्रसंगांच्या चित्रांचे रेखाटन करण्यात आले आहे. त्यामुळे या भिंती अप्रतिम आणि सुंदर दिसतात. ही लेणी पूर्णपणे दगडामध्ये कोरली गेली आहे. नक्षीदार खांब आणि प्रवेशद्वारे त्याचप्रमाणे भिंतींवर मुर्त्यांचे रेखाटन, खांबांवर असणारे कोरीव नक्षीकाम हे त्या काळाच्या कलेची माहिती करून देते.


5. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

1) दक्षिणेतील प्राचीन राजसत्ता कोणत्या होत्या ?

👉 दक्षिणेतील प्राचीन राजसत्ता चेर,  पांड्य आणि चोळ तसेच चालुक्य , वाकाटक व सातवाहन या होत्या.

2) मौर्य साम्राज्याच्या -हासानंतर कोणत्या प्रदेशातील स्थानिक राजे स्वतंत्र झाले ?

👉 मौर्य साम्राज्याच्या -हासानंतर उत्तर भारताप्रमाणेच महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक या दक्षिणेकडील प्रदेशांतील स्थानिक राजे स्वतंत्र झाले.


6. थोडक्यात उत्तरे लिहा.

1) महेंद्रवर्मनची कामगिरी लिहा.

👉 i) महेंद्रवर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता.

ii) पल्लव राजघराण्यात महेंद्रवर्मन हा कर्तबगार राजा होऊन गेला.

iii) महेंद्रवर्मन स्वतः नाटककार होता. त्याने विविध कलांना प्रोत्साहन दिले.

2) त्रिसमुद्रतोयपीतवाहन म्हणजे काय, ते स्पष्ट करा.

👉 i) त्रिसमुद्र म्हणजे बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्र आणि तोय म्हणजे पाणी.

ii) त्रिसमुद्रतोयपीतवाहन म्हणजे ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्राचे पाणी प्यायले आहे असा राजा.

iii) गौतमीपुत्र सातकर्णी या पराक्रमी राजाचे वर्णन नाशिकच्या एका शिलालेखात या शब्दात केलेले आहे.

3) मुझिरीस बंदरातून कोणत्या वस्तूंची निर्यात होत असे ?

👉 i) मुझिरीस हे केरळच्या किनाऱ्यावरील कोचीन जवळील महत्त्वाचे बंदर होते.

ii) या बंदरातून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने इत्यादि वस्तूंची इटलीमधील रोम आणि पश्चिमेकडील देशांमध्ये निर्यात होत असे.



 हे पण वाचा 👇

8 मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये स्वाध्याय 6वी इतिहास

10 प्राचीन भारत संस्कृतिक स्वाध्याय 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या