8 मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये स्वाध्याय 6वी इतिहास | maurya samrajyanantarachi rajye swadhyay 6vi itihas

 8 मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये स्वाध्याय 

मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये स्वाध्याय | maurya samrajyanantarachi rajye swadhyay


1. सांगा पाहू.

1) भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राज्य.

👉 कुशाण.

2) कनिष्काने काश्मीरमध्ये वसलेले शहर.

👉 कनिष्कपूर.

3) विणावादनात प्रवीण असलेला राजा.

👉 समुद्रगुप्त.

4) कामरूप म्हणजेच.

👉 प्राचीन आसाम.


2. पाठातील नकाशाचे निरीक्षण करून गुप्तांच्या साम्राज्यातील आधुनिक शहरांच्या नावांची यादी करा.

👉 दिल्ली, मगध, पटणा.


3. चर्चा करा व लिहा.

1) सम्राट कनिष्क

👉 कनिष्काचे साम्राज्य पश्चिमेला काबूल पासून पूर्वेला वाराणसीपर्यंत पसरले होते. कनिष्काची सोन्याची आणि तांब्याची नाणी सापडली आहेत. कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद काश्मीरमध्ये भरवण्यात आली होती. कनिष्काने काश्मीरमध्ये कनिष्कपूर हे शहर वसवले होते. श्रीनगरजवळ असलेले काम्पुर नावाचे गाव म्हणजेच कनिष्कपूर असावे. कनिष्काच्या काळात अश्वघोष हा कवी होऊन गेला. त्यांनी ' बुद्धचरित्र ' आणि ' वस्त्रसूचि ' हे ग्रंथ लिहिले. कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता.


2) मेहरौली येथील लोहस्थंभ

👉 दिल्ली जवळील मेहरौली येथे एक लोहस्तंभ उभा आहे. तो सुमारे दीड हजार वर्षाहूनही अधिक जुना आहे तरी तो गजलेला नाही. प्राचीन भारतीयांनी तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीची ते एक प्रतीक आहे. या लोहस्तंभावरील लेखात चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे. त्या उल्लेखाच्या आधारे हा लोहस्तंभ दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळातील आहे असे मानले जाते.


4. पाठतील विविध ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या नावांची यादी करा.

👉 


5. गुप्त राजघराणे आणि वर्धन राजघराणे यांचा तुलनात्मक तक्ता पुढील मुद्द्यांच्या आधारे तयार करा.

👉 

गुप्त राजघराणे आणि वर्धन राजघराणे यांचा तुलनात्मक तक्ता


6. पुढील शब्दकोडे सोडावा.

👉

शब्दकोडे


 हे पण वाचा 👇

7 मौर्यकालीन भारत स्वाध्याय 6 वी इतिहास

9 दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये स्वाध्याय 6 वी इतिहास

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या