5 प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह स्वाध्याय 6 वी इतिहास Prachin bharatatil dharmik pravah swadhyay 6vi itihas

 5 प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह स्वाध्याय 

प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह स्वाध्याय  Prachin bharatatil dharmik pravah

1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

(1) जैन धर्मात अहिंसा या तत्वाला महत्त्व दिलेले आहे.

(2) सर्व प्राणिमात्रांविषयी  करुणा हे गौतम बुद्धांच्या व्यक्तिमत्त्वाचे असाधारण वैशिष्ट्ये होते.


2. थोडक्यात उत्तरे द्या.

(1) वर्धमान महावीरांनी कोणती शिकवण दिली ?

👉 मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चारित्र्यावर अवलंबून असतो, अशी वर्धमान महावीरांची शिकवण होती.

(2) गौतम बुद्धांचे कोणते वचन विख्यात आहे, त्यातून कोणती मूल्ये प्रकट होतात.

👉 i) गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीच्या स्वातंत्र्याची घोषणा केली.

ii) जन्माने कोणी श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरत नाही तर आचरणावरून श्रेष्ठ आणि कनिष्ठ ठरत असतो.

iii) छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंद पणा चीव्चीवते हे गौतम बुद्धांचे वाचन विख्यात आहे.

(3) ज्यू धर्माच्या शिकवणीत कोणत्या गुणांवर भर दिलेला आहे ?

👉 ज्यू धर्माच्या शिकवणीत न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे.

(4) ख्रिश्चन धर्मामध्ये काय सांगितले आहे ?

👉 i) ख्रिश्चन धर्माच्या शिकवणीनुसार देव एकच आहे. तोच  सर्वांचा प्रेमळ पिता आहे आणि सर्वशक्तिमान आहे.

ii) येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र आहेत आणि मानवजातीच्याउद्धारासाठी पृथ्वीवर आलेले होते असे मानले जाते.

iii) आपण सार्वजन एकमेकांचे बंधुभगिनी आहोत. आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे, अगदी शत्रूवर देखील.

iv)चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे, असे ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितले आहे.

(5) इस्लाम धर्माची शिकवण काय सांगते ?

👉 i) ‘इस्लाम’ या शब्दाचा अर्थ ‘शांती’ असा आहे. या शब्दाचा अर्थ‘अल्लाहला शरण जाणे’ असाही होतो.

ii)  सर्वकाळी आणि सर्वत्र फक्त अल्लाह आहे, तो सर्वशक्तिमान आणि परम दयाळू आहे, असे इस्लाममध्ये सांगितलेले आहे.

iii)  मानवी अस्तित्वाचा हेतू अल्लाहची उपासना करणे हाच आहे, असे मानलेले आहे.

iv) मनुष्याने आयुष्यात कसे वागावे याची इस्लाम धर्मात शिकवण दिली आहे.

(6) पारसी विचारसरणीचा गाभा कोणता आहे ?

👉 उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही तीन प्रमुख आचरणतत्त्वे हा पारशी विचारसरणीचा गाभा आहे.


3. टीपा लिहा.

(1) आर्यसत्ये

👉  मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी चार सत्ये आहेत त्यांनाच आर्यसत्ये म्हटलेले आहे.

 i) दुःख - मानवी जीवनात दुःख असते.

 ii) दुःखाचे कारण - दुःखाला कारण असते.

 iii) दुःख-निवारण - दुःख दूर करता येते.

 iv) प्रतिपद - प्रतिपद म्हणजे मार्ग. हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे. हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे. या मार्गाला ‘अष्टांगिक मार्ग’ असे म्हटले आहे.

(2) पंचशील

👉 गौतम बुद्धांनी पाच नियमांचे पालन करण्यास सांगितले. त्या नियमांनाच ‘पंचशील’ असे म्हणतात.

 i) प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे.

 ii) चोरी करण्यापासून दूर राहणे.

 iii) अनैतिक आचरणापासून दूर राहणे.

iv) असत्य बोलण्यापासून दूर राहणे.

v) मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे.


4. खाली दिलेल्या पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यांची तक्त्यात वर्गीकरण करून लिहा.

(1) अहिंसा (2) सम्यक दर्शन (3) सत्य (4) अस्तेय (5) सम्यक ज्ञान (6) अपरिग्रह (7) सम्यक चरित्र (8) ब्रम्हचर्य

👉

पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने panchamahavrate triratne



5. कारणे लिहा.

(1) वर्धमान महावीरांना ' जिन ' का म्हणू लागले ?

👉 शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा, यांचा स्वतःवर काहीही परिणाम होऊ न देणे, म्हणजे विकारांवर विजय मिळवणे. असा विजय त्यांनी मिळवला, म्हणून त्यांना ‘जिन’ म्हणजे ‘जिंकणारा’,असे म्हटले जाऊ लागले.

(2) गौतम बुद्धांना ' बुद्ध ' असे का म्हटले गेले ?

👉 गौतम बुद्धांना ‘बुद्ध’ असे का म्हटले गेले कारण ... त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते, म्हणून त्यांना ‘बुद्ध’ असे म्हटले.


हे पण वाचा 👇

4 वैदिक संस्कृती स्वाध्याय 6 वी इतिहास

6 जनपदे आणि महाजनपदे स्वाध्याय 6 वी इतिहास


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या