2 समाजातील विविधता स्वाध्याय 6वी नागरिकशास्त्र | samajatil vividhata swadhyay 6vi nagarikashastra

2 समाजातील विविधता स्वाध्याय 

समाजातील विविधता स्वाध्याय | samajatil vividhata swadhyay 

1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.

1) विविध समुहांच्या बरोबर राहणे म्हणजे सहअस्तित्व अनुभव होय.

2) भारत हे जगातील एक महत्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे.

3) सहकार्यामुळे समाजातील  परस्परावलंबन अधिक निकोप होतो.


2. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

1) सहकार्य म्हणजे काय ?

👉  परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत कारणे व देवाणघेवाण करणे म्हणजे सहकार्य होय.

2) धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व आपण का स्वीकारले ?

👉 भारत हे जगातील एक महत्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर आहे. ही विविधता निकोपपणे  जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व स्वीकारले आहे.


3. खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा.

1) भारतीय समाजातील एकता कशातून दिसून येते ?

👉 भारतीय समाजात अनेकविध भाषा, धर्म, संस्कृती, चालीरीती, परंपरा आहेत. विविधता आपले सांस्कृतिक वैभव आहे.  विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशात आहेत. त्यांच्यात विविधतेची देवाणघेवाण आहे. आपल्या देशातील हे विविध समूह वर्षानुवर्षे एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झाली आहे. भारतीय समाजातील एकता यातून दिसून येते.

2) समाजात संघर्ष केंव्हा निर्माण होऊ शकतात ?

👉 व्यक्ती-व्यक्तींमधील मते, विचार आणि दृष्टिकोन जुळले नाहीत तर वाद, संघर्ष निर्माण होऊ शकतात. एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज हेही संघर्षाचे कारण असू शकते.

3) सहकार्यामुळे कोणते फायदे होतात ?

👉 सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते.  समाजातील सर्व लोकांना सामावून घेता येते.   परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत होते. आपला विकास विकास होतो आणि  दैनंदिन जीवनही सुरळीत चालते. इत्यादी फायदे आपल्याला सहकार्यामुळे होतात.

4) तुमच्या समोर दोन मुले भांडत आहेत, तर तुम्ही काय कराल ?

👉 माझ्यासमोर भांडत असलेल्या मुलांना मी मोठ्या माणसांच्या मदतीने भांडण थांबवण्याचा प्रयत्न करेन. २)   भांडण थांबल्यानंतर त्यांच्या भांडणाचे कारण जाणून घेईन. ज्याची चुक असेल त्याला त्याची चूक समजावून सांगेन व स्वतची चूक स्वीकारायला सांगून दुसऱ्या मुलाची माफी मागायला सांगेन. भांडणामुळे कोणते वाईट परिणाम घडून येतात याबबत दोघांनाही समजावेन. ३)   दोघांची समजूत घालून दोघांनाही एकमेकांशी मैत्री करायला सांगेन आणि परत असे न वागण्याबाबत बजावेन.

5) तुम्ही शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आहात तुम्ही कोणकोणते कार्य कराल ?

👉 शाळेच्या मंत्रिमंडळात असलेले सर्व मंत्री आपापली कामे व्यवस्थितपणे पार पाडत आहेत की नाही याची वेळोवेळी पाहणी करेन. कोणत्या मंत्र्याला जर काम करताना काही अडचणी येत असल्यास त्याला त्याबाबत योग्य ते मार्गदर्शन करेन. वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेईन आणि त्या पुढे शिक्षकांच्या सभेमध्ये मांडेन आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयात्न करेन. शाळेमध्ये चालू असणाऱ्या विविध कार्यक्रमांचे नियोजन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडेन. मंत्रिमंडळातील प्रत्येक सहकारी मंत्र्याची काळजी घेईन. मी सुद्धा त्यांच्याबरोबरीने काम करेन.


हे पण वाचा 👇

1. आपले समाजजीवन स्वाध्याय 6वी नागरिकशास्त्र 

3. ग्रामीण स्थानिक शासन संस्था स्वाध्याय 6वी नागरिकशास्त्र



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या