3 ग्रामीण स्थानीक शासन संस्था स्वाध्याय | 6 वी नागरिकशास्त्र | Gramin Sthanik Shasan Sanstha Swadhyay

 3 ग्रामीण स्थानीक शासन संस्था स्वाध्याय 

3 ग्रामीण स्थानीक शासन संस्था स्वाध्याय | 6 वी नागरिकशास्त्र | Gramin Sthanik Shasan Sanstha Swadhyay 

1. योग्य पर्यायासमोर (✓) अशी खूण करा.

1) प्रत्येक गावाचा स्थानिक कारभार ....... करते.

ग्रामपंचायत (✓) पंचायत समिती ( ) जिल्हा परिषद ( )

2) प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान ...........सभा होणे बंधनकारक असते.

चार ( )  पाच ( ) सहा (✓)

3) महाराष्ट्रात सध्या .............जिल्हे आहेत.

34 ( )  35  (  )  36 (✓)


2. यादी तयार करा.

पंचायत समितीची कामे.

👉 i) रस्ते, गटारे, विहिरी, कूपनलिका नागरिकांसाठी उपलब्ध करून देणे.

ii) रोगप्रतिबंधक लस पुरवठा करून जनतेच्या आरोग्याची काळजी घेणे.

iii) स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे.

iv) स्त्याची स्वच्छता करणे तसेच कचऱ्याची विल्हेवाट लावणे.

v) शेती व पशुधन सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करणे.

vi) प्राथमिक शिक्षणाच्या सोई उपलब्ध करून देणे.

vii) हस्तोद्योग आणि कुटीरोद्योग यांच्या विकासाला चालना देणे.

viii) दुर्बल घटकांना आर्थिक मदत करणे.


3. तुम्हाला काय वाटते ते सांगा.

1) ग्रामपंचायत विविध कर आकारते.

👉 i) आपल्या क्षेत्रातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा, दिवाबत्तीची सोय व्हावी, यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करत असते.

ii) ग्रामपंचायत गावाच्या विकासासाठी अनेक योजना आणि उपक्रम गावात राबवत असते. त्यासाठी लागणारी आर्थिक मदत उपलब्ध व्हावी यासाठी ग्रामपंचायत विविध कर आकारते.

2) महाराष्ट्रातील एकूण जिल्ह्यांच्या संख्येपेक्षा जिल्हा परिषदांची संख्या कमी आहे.

👉 कारण मुंबई शहर व मुंबई उपनगर हे ग्रामीण लोकवस्तीचे भाग नाहीत म्हणून त्यांच्यासाठी जिल्हा परिषदा नाहीत. जिल्हा परिषद फक्त ग्रामीण भागातील विकास व्हावा म्हणून कार्यरत असते.


4. तक्ता पूर्ण करा.

माझा तालुका, माझी पंचायत समिती

1) तालुक्याचे नाव .........

2) पंचायत समिती सभापतीचे नाव .....

3) पंचायत समिती उपसभापतीचे नाव ........

4) गटविकास अधिकाऱ्याचे नाव .......

5) गटशिक्षण अधिकाऱ्याचे नाव ......

( वरील रिकाम्या जागी विद्यार्थ्यांनी स्वताच्या तालुक्याची माहिती लिहावी.)


5. थोडक्यात माहिती लिहा.

1) सरपंच 

👉  ग्रामपंचायतिच्या निवडणुकांत दर पाच वर्षांनी होतात. निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एकाची सरपंच आणि एकाची उपसरपंच म्हणून निवड करतात. ग्रामपंचायतीच्या सभा सरपंचाच्या अध्यक्षते खाली होतात. गावाच्या विकास योजना प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी सरपंचावर असते. 

2) मुख्य कार्यकारी अधिकारी

👉 जिल्हा परिषदेने घेतलेल्या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी करतो. त्याची नेमणूक राज्य शासन करत असते.


हे पण वाचा 👇

2. समाजातील विविधता स्वाध्याय| 6वी नागरिकशास्त्र

4 शहरी स्थानिक शासन संस्था स्वाध्याय | 6 वी नागरिकशास्त्र | Shahari Sthanik Shasan Sanstha Swadhyay 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या