5 जिल्हा प्रशासन स्वाध्याय | 6 वी नागरिकशास्त्र | Jilha Prashasan Swadhyay

 5 जिल्हा प्रशासन स्वाध्याय

5 जिल्हा प्रशासन स्वाध्याय | 6 वी नागरिकशास्त्र | Jilha Prashasan Swadhyay 

1. एका वाक्यात उत्तरे लिहा.

1) जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ?

👉 जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो.

2) तहसीलदारावर कोणती जबाबदारी असते ?

👉 तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तहसीलदारावर असते.

3) न्यायव्यवस्थेच्या शिरोगामी कोणते न्यायालय असते ?

👉 न्यायव्यवस्थेच्या शीरोगामी भारताचे सर्वोच्च न्यायालय असते. 

4) कोणकोणत्या अपत्तींची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते ?

👉 पूर, वादळ यांसारख्या आपतींची पूर्वसूचना आपल्याला मिळू शकते.


2. योग्य जोड्या जुळवा.

      अ गट                                         उत्तरे 

(अ) जिल्हाधिकारी                (2) कायदा व सुव्यवस्था 

(आ) जिल्हा न्यायालय            (3) तंटे सोडवणे 

(इ) तहसीलदार राखणे          (1) तालुका दंडाधिकारी 


3. खालील मुद्यांवर चर्चा करा.

1) आपत्ती व्यवस्थापन

👉 i) आपत्तींचा सुव्यवस्थित व शास्त्रीय पद्धतीने सामना करण्याच्या पद्धतीला ‘आपत्ती व्यवस्थापन’ असे म्हणतात.

ii) आपत्ती व्यवस्थापनात संपूर्ण जिल्हा प्रशासन यंत्रणा गुंतलेली असते. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे अनेक आपत्तींची आता पूर्वसूचना मिळू शकते.

iii) पुराची व वादळाची पूर्वसूचना देणारी आधुनिक प्रणाली विकसित झाली आहे. या प्रणालीमुळे धोक्याची सूचना मिळते.

2) जिल्हाधिकऱ्यांची कामे

👉 i) शेतसारा गोळा करणे.

ii) शेतीशी संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणे.

iii) दुष्काळ व चाऱ्याची कमतरता यांवर उपाययोजना करणे.

iv) जिल्ह्यात शांताता प्रस्थापित करणे.

v) सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवणे.

vi) सभाबंदी, संचारबंदी, जारी करणे.

vii) निवडणूक योग्य प्रकारे पार पडणे.

viii) निवडणुकीच्या संदर्भात आवश्यक ते निर्णय घेणे.


4. तुम्हाला यापैकी कोण व्हावेसे वाटते व का ते सांगा.

1) जिल्हाधिकारी

👉 मला जिल्हाधिकारी व्हावेसे वाटते कारण, जिल्हा प्रशासनाचा प्रमुख जिल्हाधिकारी असतो. त्याची नेमणूक राज्यशासन करते. जिल्हाधिकाऱ्याला शेतसारा गोळा करण्यापासून ते जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यापर्यंत अनेक कामे करावी लागतात. 

2) जिल्हा पोलिस प्रमुख

👉 मला जिल्हा पोलीस प्रमुख व्हावेसे वाटते कारण, जिल्ह्याच्या ठिकाणी एक पोलीस अधीक्षक असतो. त्या जिल्ह्याचा तो प्रमुख पोलीस अधिकारी असतो. जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख जिल्हाधिकाऱ्यांना मदत करतात. शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस आयुक्तांवर असते.

3) न्यायाधीश

👉 आपल्या अधिकार क्षेत्रातील तंटे सोडवणे, तंट्यात न्यायनिवाडा करणे आणि संघर्षाचे वेळीच निराकरण करणे ही कामे जिल्हा पातळीवरील न्यायालयाला करावी लागतात. म्हणून मला न्यायाधीश व्हावेसे वाटते.


हे पण वाचा 👇

4 शहरी स्थानिक शासन संस्था स्वाध्याय | 6 वी नागरिकशास्त्र | Shahari Sthanik Shasan Sanstha Swadhyay 



जिल्हा प्रशासन स्वाध्याय
जिल्हा प्रशासन स्वाध्याय इयत्ता सहावी स्वाध्याय
जिल्हा प्रशासन स्वाध्याय प्रश्न उत्तरे इयत्ता सहावी
जिल्हा प्रशासन स्वाध्याय प्रश्न उत्तरे
Jilha prashasan shasan sanstha uttare eyatta sahavi
Jilha prashasan eyatta sahavi swadhyay

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या