4 शहरी स्थानिक शासन संस्था स्वाध्याय | 6 वी नागरिकशास्त्र | Shahari Sthanik Shasan Sanstha Swadhyay

 4 शहरी स्थानिक शासन संस्था स्वाध्याय    

शहरी स्थानिक शासन संस्था स्वाध्याय | Shahari Sthanik Shasan Sanstha Swadhyay 

1. पर्यायांतून योग्य पर्याय ओळखा व लिहा.

1) महाराष्ट्रातील प्रथम महानगरपालिका स्थापन करण्यात आली, त्या शहराचे नाव मुंबई

( नागपूर, मुंबई, लातूर)

2) शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज पाहते नगरपंचायत

( नगरपरिषद, महानगरपालिका, नगरपंचायत )

3) नगरपरिषदेच्या आर्थिक प्रशासनावर लक्ष ठेवतो मुख्याधिकारी

( मुख्याधिकारी , कार्यकारी अधिकारी, आयुक्त)


2. थोडक्यात उत्तरे लिहा.

1) शहरामध्ये कोणकोणत्या समस्या आढळतात ?

👉 शहरांमध्ये पुढील समस्या आढळतात.

i) निवाऱ्याच्या अपुऱ्या सोई सुविधा.

 ii) जागेचा तुटवडा .

 iii)मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी.

 iv) कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या.

 v) वाढत जाणारी गुन्हेगारी.

 vi) गलिच्छ वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्य करणारी लोकसंख्या.

2) महानगरपालिकेच्या विविध समित्यांचे नावे लिहा.

👉 महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

 i) शिक्षण समिती

 ii) आरोग्य समिती

 iii) परिवहन समिती

 iv) स्थायी समिती  

 v) पाणी पुरवठा समिती.


3. पुढील मुद्यांच्या आधारे शहरी स्थानिक शासन संस्थांविषयी माहिती देणारा तक्ता तयार करा.

👉



4. सांगा पाहू.

1) नगरपरिषदेच्या आवश्यक कामांमध्ये कोणकोणत्या कामांचा समावेश होतो ?

👉 नगर परिषदेच्या आवश्यक कामांमध्ये पुढील कामांचा समावेश होतो.

 i) सार्वजनिक रस्त्यांवर दिवाबत्तीची सोय करणे.

 ii) पाणी पुरवठा करणे.

 iii) सार्वजनिक स्वच्छता ठेवणे.

 iv) जन्म-मृत्यू, विवाह यांच्या नोंदी ठेवणे.

 v) गलिच्छ वस्त्यांमध्ये सुधारणा करणे.

vi) सार्वजनिक बाग व उद्याने बांधणे.

 vii) गुरांसाठी सुरक्षित निवारा उपलब्ध करून देणे.

2) नगरपंचायत कोणत्या ठिकाणी असते ?

👉 i) शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे नगरपंचायत असते.

ii) पूर्णतः खेडेही नाही आणि शहरही नाही अशी काही ठिकाणे आपण पाहतो. तेथील स्थानिक शासन संस्था म्हणजे नगरपंचायत होय.


हे पण वाचा 👇

3 ग्रामीण स्थानीक शासन संस्था स्वाध्याय | 6 वी नागरिकशास्त्र | Gramin Sthanik Shasan Sanstha Swadhyay 

5 जिल्हा प्रशासन स्वाध्याय | 6 वी नागरिकशास्त्र  | Jilha Prashasan Swadhyay 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या