अस्वल प्राण्यांची निबंध
अस्वल हा प्राणी अर्सिडी कुलातील असून या कुलात एकूण सात प्रजाती आणि नऊ जाती आहेत. बहुतांशी वन्य अस्वले युरोप, आशिया आणि उत्तर अमेरिकेत आढळतात. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण ध्रुवीय प्रदेशात वन्य अस्वले आढळत नाहीत. अस्वल हा एक सस्तन प्राणी असून तो प्रामुख्याने उत्तर गोलार्धात आढळतो , परंतु चष्मेवालं अस्वल दक्षिण अमेरिकेत सापडते.
अस्वलाचे वजन सामान्यत: 90 ते 115 किलो ग्रॅ. एवढे असते. मादीपेक्षा नर आकाराने मोठा असतो. अस्वले बोजड असतात व शरीराच्या मानाने त्यांचे पाय छोटे असतात. ते त्यांचे मागील पाय पूर्ण टेकवून चालतात, तर इतर मांसाहारी प्राणी टाचांवर चालतात. अस्वले त्यांच्या मागील पायांवर उभी राहू शकतात किंवा बसू शकतात. जेव्हा त्यांना एखादा धोका जाणवतो तेव्हा ते बहुधा मागील पायांवर उभे आपल्याला आढळून येतात. त्यांची दृष्टी कमकुवत असल्यामुळे देखील ते बऱ्याचदा अंदाज घ्यायला उभे राहतात. अस्वलांचे नाक खूप तीक्ष्ण असते, व त्यांचे खाद्य शोधायला ते नाकावरच अवलंबून असतात.
जंगलातील कोणतीही निवार्याची जागा अस्वलाला राहायला चालते. ते निशाचर आहे. भक्ष्य मिळविण्याकरिता ते संध्याकाळी बाहेर पडते व पहाटे निवासस्थानी परतते. अस्वलांचे खाद्य वैविध्यपूर्ण असले तरी ते फळे, मुळे, किडे व मांस खातात. उत्तरेकडील ध्रुवीय अस्वल प्रामुख्याने समुद्रातील सस्तन प्राणी खातो (सील,वॉलरस इत्यादी), तर चीन मधील पांडा जातीचे अस्वल बांबू खातो. भारतातील अस्वल (स्लॉथ बेअर) हे प्रामुख्याने वाळव्या, मुंग्या व इतर किडे खाते. एका भोजनाच्या वेळी ते दहा हजार वाळव्या खाऊ शकते.
हे पण वाचा 👇
अस्वल 10 ओळींचा निबंध | 10 lines esay on Bear | asval 10 olincha nibandh
0 टिप्पण्या